
IPL 2025 : आयपीएल 2025 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून लढतही खूप चुरशीची झाली आहे. विराट कोहलीच्या आरसीबीने आयपीएल फायनलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा धडक मारली आहे. यावेळी तरी आरसीबीला आयपीची अंतिम लढत जिंकून चषकावर नाव कोरता येतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान IPL 2025 मध्ये विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा जेव्हा जेव्हा RCBची मॅच पाहण्यास स्टेडियममध्ये जाते, तेव्हाच बहुतांश वेळेस तिच्यासोबत एक महिला बसलेली दिसते. त्या महिलेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिने कथितरित्या ऋषभ पंतला ‘स्टूपिड’ (मूर्ख) म्हटलं , असा दावा केला जात आहे ती महिला नेमकी आहे तकी रोण आणि काय करते ? चला जाणून घेऊया.
27 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात शतक झळकावल्यानंतर ऋषभ पंतने अॅक्रोबॅटिक शैलीत आनंद साजरा केला तेव्हा ही अनुष्काच्या शेजारी बसलेली ही महिला बरीच चर्चेत आली. त्याच महिलेने पंतला ‘मूर्ख’ म्हटल्याचा दावाही केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचं नाव मालविका नायक असं आहे.
कोण आहे ती महिला ?
अनुष्का शर्माच्या शेजारी बसलेल्या महिलेचे नाव मालविका नायक आहे असं सांगितलं जात. मालविका ही बिझनेस क्षेत्रात खूप सक्रिय आहे आणि तिला अनेक वर्ष काम करण्याचाही अनुभव आहे. इंटेलनेट या आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीमध्ये तिने काम केले आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर तिने इनोस टेक्नॉलॉजीमध्येही काम केले, अशी माहिती समोर आली आहे. बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, पार्टनरशिप आणि मार्केटिंग इंडस्ट्रीचाही तिला बराच अनुभव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालविका नायक हिने अनेक मोठ्या क्लायंटसोबत काम केले असून तिला प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये बराच अनुभव आहे. तिने एमबीए केलं असून तिला कायदेशीर करारांव्यतिरिक्त,(लीगल अग्रीमेंट) व्यवसाय कायद्यांचीही चांगली समज आहे.
RCB चा प्लेऑफपर्यंतचा प्रवास
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचा आपीएल 2025 च्या प्लेऑफपर्यंतचा प्रवास शानदार होता. लीग टप्प्यात, आरसीबीने 14 पैकी 9 सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले, आणि त्याच्याच आधारे त्या टीमने क्वॉलिफायर-1 मध्ये प्रवेश केला. पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वी 13 डावांमध्ये 602 धावा काढल्याने विराट कोहलीने, प्लेऑफच्या प्रवासात आपण आरसीबीसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध केले.