IND vs PAK : पाकिस्तानचा नवीन बॉलर उस्मान तारीक टीम इंडियासाठी का धोकादायक? आधीच दिला इशारा

IND vs PAK : T20 वर्ल्ड कप 2026 सुरु झाला आहे. भारताचा सामना 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानचा नवीन बॉलर उस्मान तारिकचा सामना करणं टीम इंडियासाठी चॅलेंजिंग असेल. असं का? जाणून घ्या.

IND vs PAK : पाकिस्तानचा नवीन बॉलर उस्मान तारीक टीम इंडियासाठी का धोकादायक? आधीच दिला इशारा
IND vs PAK
Image Credit source: PTI/VIDEOGRAB
| Updated on: Feb 11, 2026 | 11:21 AM

Usman Tariq : पाकिस्तानचा एक नवीन बॉलर चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो अजून 5 सामनेही खेळलेला नाही. पण तरीही त्याची चर्चा आहे. परफॉर्मन्सपेक्षा बॉलिंग Action मुळे त्याची जास्त चर्चा आहे. पाकिस्तानच्या या नव्या गोलंदाजाचं नाव आहे उस्मान तारीक. हा स्पिनर आहे. उस्मान तारीकची गोलंदाजीची Action आयसीसीच्या निकषांमध्ये बसते. पण मैदानावरच्या प्रतिस्पर्धी टीमला मात्र त्याच्या गोलंदाजी Action मध्ये गडबड वाटते. USA विरुद्ध काल उस्मान तारीक आपला पहिला सामना खेळला. आता त्याच्यासमोर टीम इंडियाचं आव्हान असेल. मेन इन ब्लू म्हणजे भारतीय संघासाठी उस्मान तारीक धोकदायक ठरु शकतो. पण का?. 15 फेब्रुवारील भारत-पाकिस्तानमध्ये श्रीलंकेत बहुचर्चित सामना होणार आहे.

उस्मान तारिकने भारताला इशारा दिला आहे. दोन कारणांमुळे उस्मान तारिकमध्ये हा आत्मविश्वास आलाय. एक म्हणजे परफॉर्मन्स आणि दुसरं कारण आहे, बॉलिंग Action वर वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही कारवाई होत नाही. उस्मान तारिकने म्हटलय की, माझ्यावर माझ्या बॉलिंग Action चा कुठलाही दबाव नाहीय. उलट दबाव भारतावर असेल.

तो दगड टाकतो असं म्हटलं होतं

उस्मान तारिकची बॉलिंगची शैली कशी आहे?. सर्वप्रथम तो गोलंदाजी करताना थोडं थांबून हातातून चेंडू सोडतो. म्हणजे असं वाटचं की, जणू तो थांबून पाहतो की फलंदाज कुठल्या बाजूला चाललाय. त्यानुसार चेंडू टाकतो. टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान टी 20 सीरीजवेळी त्याच्या बॉलिंग ACtion वरुन बराच वाद झाला होता. कॅमरुन ग्रीनने तो दगड टाकतो असं म्हटलं होतं. पण सत्य हे आहे की, ICC ने त्याला क्लीन चीट दिलीय. ICC च्या एलिट पॅनलमधील अंपायर्सनाही त्याच्या गोलंदाजी शैलीत काही गडबड वाटत नाही.

त्याच्या गोलंदाजीत खास काय?

उस्मान तारिक भारतासाठी धोकादायक का ठरु शकतो? पाकिस्तानसाठी त्याने रचलेला इतिहास हे त्यामागे कारण आहे. तो पाकिस्तानला असा गोलंदाज आहे, ज्याचा टी 20 मध्ये विकेट घेण्याचा वेग जास्त आहे. मागच्या 23 टी 20 सामन्यात उस्मान तारिकने प्रत्येकवेळी एक विकेट घेतलाय. या 23 सामन्यात चार T20 इंटरनॅशनलचे सामनेही आहेत, ज्यात त्याने 11 विकेट घेतलेत. उस्मान तारिकच्या फॉर्मशिवाय त्याची बॉलिंग ACtion सुद्धा टीम इंडियाची डोकेदुखी वाढवू शकते. चिंता यासाठी आहे कारण भारतीय फलंदाज पहिल्यांदाच त्याचा सामना करणार आहेत. उस्मान तारिककडे मिस्ट्री स्पिनर म्हणून पाहिलं जातं. फक्त बॉलिंग Action च नाही, तर त्याच्या चेंडूंमध्ये वेरिएशन वैविध्य सुद्धा आहे. हाय-आर्म गुगली, कॅरम बॉल, लो आर्म गुगली आणि क्विकर डिलीवरी असे काही खास चेंडू त्याच्या भात्यात आहेत.