Womens World Cup 2025 : न्यूझीलंडला हरवलं, आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरुद्ध? उद्या समजणार

India Women Semi-Final Fixture : न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण आता त्यांचा सामना कोणाविरुद्ध होणार? ते उद्या समजू शकते. पॉइंट्स टेबलमध्ये कुठल्या टीम्सच स्थान बदलू शकतं?

Womens World Cup 2025 : न्यूझीलंडला हरवलं, आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाविरुद्ध? उद्या समजणार
Womens Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 24, 2025 | 8:53 AM

India Semi-Final Fixture in Womens World Cup : टीम इंडिया महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारी चौथी आणि शेवटची टीम बनली आहे. 23 ऑक्टोंबरला म्हणजे काल नवी मुंबईत सामना झाला. न्यूझीलंडला डकवर्थ लुईस नियमानुसार 53 धावांनी हरवून भारतीय महिला टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे क्वालिफाय करणारे अन्य 3 संघ ठरले. या त्याच तीन टीम आहेत, ज्यांच्याकडून ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया सलग तीन सामने हरली. पण सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणा बरोबर होणार? टीम इंडियासमोर वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये कोणाचं आव्हान असणार?

पॉइंट्स टेबलवर नजर टाकली, तर प्रत्येकी 6-6 सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया 11 पॉइंट्ससह टॉपवर आहे. तेच दक्षिण आफ्रिका 6 सामन्यात 10 पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड तिसऱ्या नंबरवर आहे. त्यांचे 6 सामन्यात 9 पॉइंट आहेत. भारतीय टीम 6 सामन्यात 6 पॉइंट घेऊन टॉप फोरमध्ये प्रवेश करणारी शेवटची टीम आहे.

टीम इंडियाचा शेवटचा सामना कोणाविरुद्ध?

सेमीफायनलमध्ये प्रवेश करुनही सगळ्या टीम्सचा ग्रुप स्टेजमध्ये 1-1 सामना बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि इंग्लंडचा न्यूझीलंड विरुद्ध सामना बाकी आहे. भारतीय टीम बांग्लादेशचा सामना करेल. टीम इंडियाने आपला शेवटचा सामना जिंकला, तरी त्यांच्या पोजिशनमध्ये बदल होणार नाही. कारण बांग्लादेशवरील विजयानंतर टीम इंडियाचे 8 पॉइंट होतील. ते नंबर चारवरच राहतील. टॉप 3 पोझिशनमध्ये बदल होऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याचा निकाल महत्वाचा

शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं तर ते 13 पॉइंटसह नंबर वन स्थानावर कायम राहतील. दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर जाईल. कारण या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे 12 पॉइंट होतील. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची शक्यता कमी आहे. कारण आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 18 वनडे सामन्यात फक्त एकदाच दक्षिण आफ्रकेची टीम ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाला हरवू शकली आहे. 16 वेळा दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इंग्लंडचे किती पॉइंट?

इंग्लंडकडे सुद्धा दुसऱ्या नंबरवर पोहोचण्याची संधी आहे. न्यूझीलंडला साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात हरवलं तर त्यांचे 11 पॉइंट होतील. ते दुसऱ्या स्थानावर जातील. पण त्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव होणं सुद्धा आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकली, तर इंग्लंडची टीम तिसऱ्या क्रमांकावरच राहीलं.

टीम इंडियाचा सामना कोणाविरुद्ध?

आता प्रश्न हा आहे की, महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कुठल्या संघाविरुद्ध सामना होईल? सेमीफायनलचा सामना 29 ऑक्टोंबरला गुवहाटीमध्ये होणार आहे. त्यात टीम इंडियाचं खेळणं निश्चित आहे. टुर्नामेंटच्या रचनेनुसार, सेमीफायनलमध्ये चौथ्या नंबरवर असलेल्या टीमचा म्हणजे भारताचा सामना टॉपवर असलेल्या टीम बरोबर होईल. आता टीम ऑस्ट्रेलिया आहे की दक्षिण आफ्रिका हे 25 ऑक्टोंबरला कळेल.