
न्यूझीलंडविरुद्ध राहुल द्रविडने सर्वाधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 15 कसोटी सामन्यात त्याने 63.80 च्या सरासरीने 1659 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्यांदा 1997 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. कसोटीच्या दोन्ही डावात त्याने दमदार शतक झळकावली होती. अशी कामगिकी करणाराा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला होता.

सचिन तेंडुलकर हा किवी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये 1595 धावा केल्या आहेत. त्याने द्रविडपेक्षा कमी धावा केल्या असतील पण त्याने बऱ्याच महत्त्वापूर्ण खेळी केल्या. न्यूझीलंडविरुद्ध त्याने दुहेरी शतकही केलं.

किवींविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या वीरेंद्र सेहवागने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या चार कसोटी सामन्यात तो केवळ 40 धावा करू शकला. त्याने 12 सामन्यांत 44.15 च्या सरासरीने 883 धावा केल्या असून त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मणला न्यूझीलंडविरुद्धच्या सुरुवातीच्या मालिकेत यश मिळू शकले नाही, परंतु त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. दोन कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये त्याने एक दमदार शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. त्याने 10 सामन्यांत 58.42 च्या सरासरीने 818 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारत अ आणि अंडर 19 मध्ये राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळले आहेत. रिषभ पंत, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, हनुमा विहारी द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या नक्कीच प्रयत्न करतील.