Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज, सुरु केली नवी इनिंग, पोस्ट करत थेट जाहीर केलं

Yashasvi Jaiswal New Inning: भारतीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने क्रिकेटच्या मैदानावर आपले नाव कमावले आहे. आता यशस्वीने एक मोठं पाऊल उचलले आहे. यशस्वीने आता चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज, सुरु केली नवी इनिंग, पोस्ट करत थेट जाहीर केलं
| Updated on: Oct 16, 2026 | 9:34 AM

Yashasvi Jaiswal Business: भारतीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने क्रिकेटच्या मैदानावर आपले नाव कमावले आहे. तो कसोटी संघाचा नियमित सदस्य असून भारतीय संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करतो. पण टी-२० आणि वनडे संघात अजून तो जागा मिळवू शकला नाही. आता यशस्वीने एक मोठं पाऊल उचलले आहे. यशस्वीने आता चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

यशस्वीने स्वत:चा व्यवसाय सुरु केलाय. YBJ Fits नावाचा स्वत:चा ब्रँड सुरु केलाय. व्यवसायात उतरणारा जैस्वाल हा पहिला क्रिकेटपटू नाही. विराट कोहली, एम.एस. धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी आप आपले व्यवसाय सुरु केले आहेत. आता यशस्वी त्याच्या ब्रँड अंतग्रत  कपडे आणि बॅग्स विकणार आहे. यशस्वीने स्वतः ही घोषणा केली आणि आपल्या ब्रँडचे नावही जाहीर केले.

Loading...

यशस्वीने आपल्या नवीन ब्रँडचे नाव YBJ Fits ठेवले आहे. त्याची कंपनी कपडे आणि बॅग्सचे उत्पादन करेल. त्याने स्वतः इंस्टाग्रामवर ही घोषणा केली. त्याने आपल्या ब्रँडसाठी एक पेजदेखील तयार केले आहे, जिथे त्यासंबंधित सर्व माहिती दिली आहे. सध्या त्याच्या पेजवर टी-शर्ट आणि लगेज दिसत आहेत, जे लवकरच उपलब्ध होतील. त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली असून, त्याच्या कंपनीचा लोगोही समोर आला आहे.

जैस्वाल क्रिकेटमध्येही नवीन गोष्टींचा प्रयोग करत आहे. तो नुकताच रणजी ट्रॉफीदरम्यान यष्टीरक्षण करताना दिसला होता. यापूर्वी तो फिरकी गोलंदाजी करायचा, पण सरावादरम्यान तो यष्टीरक्षण करताना दिसला होता. भारतीय संघ या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे टीम इंडिया पाच टी-२० आणि तेवढ्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी, बीसीसीआयने प्रथम इंडिया ‘अ’ संघाला न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे तीन सामन्यांची अनधिकृत मालिका खेळली जाईल. या यादीत जैस्वालचाही समावेश आहे. ही मालिका २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us