AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबकडून युवराजला, तर दिल्लीकडून गंभीरला घरचा रस्ता, दिग्गजांची सुट्टी

मुंबई : आयपीएल 2018 साठी पाण्यासारखा पैसा ओतूनही किंग्ज इलेव्हन पंजाबला म्हणावं तसं यश आलं नाही. आयपीएलच्या अकराव्या मोसमात पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर संघ व्यवस्थापनाने आता मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. पंजाबने 2019 साठी सध्या संघात असलेले फक्त नऊ खेळाडू रिटेन करण्याचा म्हणजे त्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सिक्सर किंग युवराज सिंहसह 12 खेळाडूंना घरचा […]

पंजाबकडून युवराजला, तर दिल्लीकडून गंभीरला घरचा रस्ता, दिग्गजांची सुट्टी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई : आयपीएल 2018 साठी पाण्यासारखा पैसा ओतूनही किंग्ज इलेव्हन पंजाबला म्हणावं तसं यश आलं नाही. आयपीएलच्या अकराव्या मोसमात पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर संघ व्यवस्थापनाने आता मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. पंजाबने 2019 साठी सध्या संघात असलेले फक्त नऊ खेळाडू रिटेन करण्याचा म्हणजे त्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

सिक्सर किंग युवराज सिंहसह 12 खेळाडूंना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. युवराज, अॅरॉन फिंच यांच्यासह अनेक खेळाडूंना रिलीज करण्यात आलंय. युवराजचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचं करिअर जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र आहे. कारण, गेल्या आयपीएलमध्येही त्याच्यावर बोली लावण्यास कुणी उत्सुक नव्हतं.

कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केल्यानंतर आता फक्त फॉर्मात असलेल्या खेळाडूंनाच रिटेन करण्याचं किंग्ज इलेव्हन पंजाबने ठरवलंय. पंजाबने आर. अश्विन, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रहमान, अंकित राजपूत आणि डेव्हिड मिलर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

पुढच्या मोसमात बोली लावण्यासाठी पंजाबच्या पाकिटात आता बक्कळ पैसा असेल. कारण, त्यांनी मोठमोठ्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. शिवाय संघात जास्तीत जास्त युवा खेळाडू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं संघाचे कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांचं म्हणणं आहे.

सर्व संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत पुढच्या महिन्यात होणाऱ्या लिलावासाठी रिटेन आणि रिलीजची यादी सादर करणं बंधनकारक होतं.

पंजाबने आर. अश्विन, केएल राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर, अँड्र्यू टाय, मुजीब उर रहमान, अंकित राजपूत, ख्रिस गेल आणि डेव्हिड मिलर यांना रिटेन केलं आहे. तर युवराज सिंह, अॅरॉन फिंच, मोहित शर्मा, मनोज तिवारी, बरिंदर सरन, अक्षदीप नाथ, प्रदीप साहो, मयंक डागर, मंजूर यांना रिलीज केलं आहे.

दिल्लीकडून गौतम गंभीर रिलीज

दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे, तर 14 खेळाडूंना रिटेन केलंय, ज्यामध्ये शिखर धवनचाही समावेश आहे. गौतम गंभीरलाही दिल्लीने रिलीज केलं आहे. गेल्या मोसमात गंभीरने सुरुवातीच्या पराभवानंतर कर्णधारपद सोडलं आणि ती जबाबदारी श्रेयस अय्यरकडे दिली.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, मनजोत कालरा, कॉलिन मुनरो, ख्रिस मॉरिस, जयंत यादव, राहुल तेवतिया, हर्षल पटेल, अमित मिश्रा, कगीसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, संदीप मलिछाने, अवेश खान यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

गौतम गंभीर, जेसन रॉय, गुरकीरत मान, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, डेन ख्रिश्चियन, विजय शंकर, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, सायन घोष, लियाम प्लंकेट, जुनियर डाला, नमन ओझा यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.