ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?

| Updated on: Jun 02, 2020 | 9:38 AM

युवराजने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये विनोदी शैलीत युजवेंद्र चहलवर टिप्पणी केली. मात्र यामध्ये जातीवाचक उल्लेख झाल्याने अनेकांचा संताप झाला. (Yuvraj Singh asked to apologize on Twitter)

ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह नव्या वादात अडकला आहे. युवराजने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये जातीवाचक शब्द वापरल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यानंतर ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. (Yuvraj Singh asked to apologize on Twitter)

ज्या चॅटबद्दल वाद सुरु आहे, तो बराच जुना आहे. काही दिवसांपूर्वी युवराज सिंह इंस्टाग्रामवर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माबरोबर लाईव्ह चॅट करत होता. यावेळी दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट, कोरोना आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि गोलंदाज कुलदीप यादव यांचा उल्लेख होता.

युजवेंद्र चहल सध्या आपल्या कुटुंबासह नेहमी व्हिडिओ पोस्ट करत असतो, याची चर्चा करताना युवराजने विनोदी शैलीत त्याच्यावर टिप्पणी केली. मात्र यामध्ये जातीवाचक उल्लेख झाल्याने अनेकांचा संताप झाला. यावरुन युवराज सिंहने जाहीर माफी मागावी, अशी मागणी ट्विटरवर केली जात आहे.

काही जणांनी मात्र युवराजला पाठींबा दर्शवला आहे. युवराज हलक्याफुलक्या पद्धतीत मित्राशी बोलत होता. इतक्या लहान गोष्टी लोकांनी मनाला लावून घेऊ नयेत, अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे.

हेही पाहा :

 PHOTO : हार्दिक पांड्या बाबा बनणार, नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणतो…

 “बाप बाप होता है” वगैरे घडलंच नाही, सेहवाग खोटारडा : अख्तर

(Yuvraj Singh asked to apologize on Twitter)