Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर
धनश्री वर्मा (इन्स्टाग्राम स्नॅप)

बीसीसीआयने आयपीएलसंदर्भात महत्त्वाची आणि मोठी घोषणा करताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्माला (Dhanashree Verma) अत्यानंद झाला.

Akshay Adhav

|

May 30, 2021 | 6:43 AM

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाबाबत (IPL 2021) स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये (IPL in UAE) होणार आहेत. बीसीसीआयने ही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्माला (Dhanashree Verma) अत्यानंद झाला. तिने खास डान्स व्हिडीओ शेअर करत आपला आनंद द्विगुणित केला. तसंच युएईला जाण्यासाठी तयार असल्याचं डान्स व्हिडीओमधून सांगितलं. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance video After BCCI Announcement IPL 2021 Moved UAE)

धनश्रीकडून खास व्हिडीओ शेअर

आयपीएलच्या 14 व्या पर्वातले 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. आता पुन्हा बीसीसीआयने उर्वरित मॅचेसचं नियोजन यूएईमध्ये केलं आहे. बीसीसीआयच्या या घोषणेने धनश्री वर्माला आनंद झाला. तिने इन्स्टाग्रामवर पाठीमागील वर्षाचा युएईमधला एक खास व्हिडीओ शेअर करत यूएईला जाण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं.

अक्षय कुमारच्या गाण्यावर धनश्रीचे ठुमके

बीसीसीआये आयपीएल संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर धनश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये धनश्री अक्षय कुमारच्या ‘बुर्ज खलिफा’ गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ स्पेशल आहे कारण गेल्या वर्षी युएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमादरम्यान धनश्रीने हा व्हिडिओ शूट केला होता.

डान्स व्हिडीओ शेअर करताना काय म्हणाली धनश्री?

धनश्री वर्माने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय, “बुर्ज खलिफा… गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान दुबईत…. काय बोलता… 2.0 गरज आहे ना….” धनश्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरताना दिसतोय. धनश्रीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

धनश्री सोशल मीडियाची राणी!

ती ज्या पद्धतीने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, ते पाहून ती कोणत्या अभिनेत्रीपेक्षा नक्कीच कमी नाहीय, अशा कमेंट तिचे फॅन्स करत असतात. भरीस भर म्हणजे ती दिसायला तर सुंदर आहेच त्याहूनही सुंदर ती डान्स करते. युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance video After BCCI Announcement IPL 2021 Moved UAE)

हे ही वाचा :

IPL सुरु होण्याअगोदरच मोठा झटका, 30 खेळाडू खेळू शकणार नाही!

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें