देशातील 1.7 कोटी दुकानदारांना Paytm चं गिफ्ट, वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही

डिजीटल फायनान्शिअल सर्विस प्लॅटफॉर्म पेटीएमने देशातील 1.7 कोटी दुकानदारांना खास गिफ्ट दिलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:40 PM, 27 Nov 2020

मुंबई : देशातील आघाडीची डिजीटल पेमेंट कंपनी असलेल्या पेटीएमने (Paytm) घोषणा केली आहे की, सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी पेटीएम वॉलेटद्वारे केलेल्या, स्वीकारलेल्या पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सर्व यूपीआय आधारित पेमेंट अ‍ॅप्स आणि रुपे कार्ड तसेच पेटीएम वॉलेटद्वारे (Paytm Wallet) व्यापारी आता त्यांच्या बँक खात्यात कोणत्याही शुल्काशिवाय अमर्याद पेमेंट्स मिळवू शकतात. देशातील 17 मिलियनहून (1.7 कोटी) अधिक व्यापाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. (Paytm’s gift to 1.7 crore shoppers in the country, there is no charge on payment made through wallet)

पेटीएमच्या या निर्णयानं देशभरातील व्यापाऱ्यांना सर्वच व्यवहारांसाठी एकमेकांना सहकार्य करण्यास मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांना, दुकानदारांना आता त्यांच्या काऊंटरवर अनेक प्रकारचे क्यूआर कोड ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त पेटीएमचा ‘ऑल-इन-वन क्यूआर’ आवश्यक आहे जेणेकरुन पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय आणि अन्य कोणत्याही यूपीआय अ‍ॅपकडून पेमेंट्स स्वीकारता येतील.

पेटीएमचे वरीष्ठ उपाध्यक्ष कुमार आदित्य म्हणाले की, “आम्ही देशभरातील आमच्या व्यापारी भागिदारांना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी आता कोणत्याही शुल्काची चिंता न करता पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट्स स्वीकारावेत. याद्वारे त्यांची अधिक बचतही होणार आहे. तसेच आता ते पेटीएमच्या ‘ऑल-इन-वन क्यूआर’ कोडद्वारे कोणत्याही यूपीआय अ‍ॅपकडून पेमेंट्स स्वीकारु शकतील”.

काही दिवसांपूर्वी पेटीएमने (Paytm) लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली होती. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं आहे की, “लघुउद्योजकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ‘कोलॅटरल फ्री लोन’ योजनेचा विस्तार केला जात आहे. यासह कमी व्याज आणि हप्त्यांमध्ये कर्जफेड (EMI) या सुविधाही दिल्या जातील”

पेटीएम लेंडिंगचे कार्यकारी अधिकारी (सीईओ) भावेश गुप्ता म्हणाले, “कोलॅटरल फ्री लोनसाठी आम्ही किराणा स्टोअर आणि इतर लघुउद्योजकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. या उद्योजकांना पारंपारिक बॅकिंग क्षेत्र मागेच सोडून देते, कर्ज देत नाही. त्यामुळे मुख्य बँकांकडून सुटलेल्या आणि ज्यांना सहज कर्ज मिळत नाही अशा लघुउद्योजकांना हे कर्ज दिलं जाईल.”

“इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर (ईडीसी) व्यापाऱ्यांवर भर देणार आणि ईडीसी व्यवहारातून कर्ज पुरवठा करणार”

पेटीएमने आपल्या व्यापारी कर्जवितरण योजनेंतर्गत (‘मर्चेंट लेंडिंग प्रोग्राम’) Paytm in Business अॅपवर कोलॅटरल फ्री लोन देण्याची व्यवस्था केली आहे. कर्जासाठी व्यापाऱ्यांची पात्रता त्यांच्या दैनंदिन व्यवहारांनुसार ठरवली जाणार आहे. पेटीएमने कर्ज देण्याच्या प्रक्रियेला डिजिटल केलं आहे. यात कर्जासाठी अर्ज करताना किंवा वितरणाला मंजूरी मिळण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची अथवा गॅरंटीची गरज असणार नाही. पेटीएमने म्हटलंय, कर्जाची मर्यादा मुख्यतः व्यापारातील व्यवहारांसाठी असणार आहे. या कर्जावर कोणतीही अधिकची शुल्क आकारणी नसेल.”

संबंधित बातम्या

Paytm लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही

Paytm च्या भागीदारीतून SBI ची दोन क्रेडिट कार्ड बाजारात, ऑनलाईन पेमेंटला मिळणार चालना

(Paytm’s gift to 1.7 crore shoppers in the country, there is no charge on payment made through wallet)