Xiaomi ची नवीन टेक्नॉलोजी, आता 19 मिनिटात बॅटरी चार्ज होणार

शाओमीने कंपनीने नवीन चार्जिंग टेक्नॉलोजी लाँच केली आहे (Xiaomi launch new wireless charger).

Xiaomi ची नवीन टेक्नॉलोजी, आता 19 मिनिटात बॅटरी चार्ज होणार

मुंबई : शाओमीने कंपनीने नवीन चार्जिंग टेक्नॉलोजी लाँच केली आहे (Xiaomi launch new wireless charger). या टेक्नॉलोजीच्या माध्यमातून आता केवळ 19 मिनिटात मोबाईलची चार्जिंग फुल होणार आहे. सध्या सर्वत्र शाओमीच्या या चार्जिंगची चर्चा सुरु आहे. शाओमीने मायक्रो ब्लॉगिगं साईटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे (Xiaomi launch new wireless charger).

या टेक्नॉलोजीच्या मदतीने 4000 mAh ची बॅटरी फक्त 19 मिनिटात फुल चार्ज होणार होऊ शकते. येथे कोणत्या फोनला 80W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट करणार याबाबत कंपनीने अद्याप सांगितलेले नाही.

वायरच्या चार्जिंग टेक्नॉलोजीला वायरलेस चार्जिंगमध्ये रिप्लेस केले आहे. शाओमीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत 80W वायरलेस चार्जिंगची झलक दाखवलेली आहे. ज्याला मॉडिफाय Mi 10 प्रोसह अॅक्शनमध्ये दाखवला होता.

8 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज

विबोवर शाओमीने एक पोस्टर पोस्ट केला होता. ज्यामध्ये 80W वायरलेस टेक्नॉलजीची माहिती दिलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 19 मिनिटात तुमच्या फोनची 4000mAh ची बॅटरी फुल चार्ज होणार. तर 0 ते 50 टक्के चार्जिंग 8 मिनिटात होणार. कंपनी पहिल्यांदा वायरलेस चार्जर लाँच करणार आहे.

वायरलेस चार्जिंगमध्ये हे तिसरे यश मिळाले आहे. कंपनीला ही चार्जिंग टेक्नॉलोजी जगासमोर मांडण्यासाठी Mi 10 प्रो ला मॉडिफाय करावे लागले. या टेक्नॉलोजीच्या मदतीने फोन 0 ते10 टक्के चार्ज 1 मिनट, 10 ते 50 टक्के 8 मिनिट आणि पूर्ण चार्ज 19 मिनिटात वेळा लागला होता.

मार्चमध्ये कंपनीने 40W चार्जिंग टेक्नॉलजी लाँच केली होती. मे मध्ये कंपनीने 30W वायरलेस चार्जर लॉन्च केला होता. तर ऑगस्टमध्ये कंपनीने 50W वायरलेस चार्जिंग लाँच केले होते.

संबंधित बातम्या :

जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार

Flipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *