10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा स्मार्ट टिव्ही, हे 5 एलईडी टीव्ही मॉडेल्स देतात दमदार साउंड क्वालिटी

तुमचा जुना टीव्ही बदलून तुम्ही नवीन 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या 5 उत्तम टीव्ही मॉडेल्सबद्दल सांगू जे दमदार साउंड क्वालिटी आणि एचडी रिझोल्यूशन सपोर्टसह येतात. कोणत्या कंपनीचा टीव्ही किती किमतीत उपलब्ध आहे? चला जाणून घेऊया.

10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा स्मार्ट टिव्ही, हे 5 एलईडी टीव्ही मॉडेल्स देतात दमदार साउंड क्वालिटी
led tv
| Edited By: | Updated on: Jun 09, 2025 | 2:47 PM

आजच्या डिजिटलच्या युगात प्रत्येक घराघरांमध्ये स्मार्ट टीव्ही आहेत. अशातच बाजारांमध्ये खूप साऱ्या कंपनीच्या टीव्ही सध्या उपलब्ध आहेत. त्यातच आपण पाहतोच अनेक कंपन्या या सनासुदीच्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वस्तुंवर डिस्कांउट देत असतात ज्यात टीव्हीवर देखील सवलत असते. अशातच अनेकजण या सवलतीचा लाभ घेत वस्तू खरेदी करतात. पण आता तुम्हाला या दिवसांमध्ये चांगल्या क्वाॉलिटी व्हिडिओ आउपूट सोबत पॉकेट फ्रेंडली स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल किंवा तुमचा जुना टीव्ही बदलून नवीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर 32 इंचाचा या टॉप 5 स्मार्ट टीव्ही आहेत ते खरेदी करू शकता. चला तर हे टीव्ही किती किमतीत उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात..

Blaupunkt TV: या टीव्हीसोबत तुम्हाला 40 वॅट्सची पॉवरफुल साउंड क्वालिटी मिळेल. तुम्ही जर हा टीव्ही खरेदी केला तर तुम्हाला 44 टक्के डिस्काउंटनंतर हा टीव्ही 9,999 रुपयांना मिळेल. हा टीव्ही जिओ हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारख्या ॲप्सना देखील सपोर्ट करतो.

Thomson TV: फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेला हा 32 इंचाचा टीव्ही मॉडेल 47टक्के सवलतीनंतर 9,499 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही एचडी रिझोल्यूशनसह येतो आणि 30 वॅट साउंड आउटपुट, तसेच नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार सारख्या ॲप्सना सपोर्ट करतो.

KODAK TV: 30 वॅट साउंड आउटपुट आणि 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला हा 32 इंचाचा टीव्ही 44 टक्के डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. हा टीव्ही जिओ हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारख्या ॲप्सना देखील सपोर्ट करेल.

Acer LED TV: या कंपनीचा 32 इंचाचा टीव्ही मॉडेल 24 वॅट्सच्या साउंड आउटपुटसह येतो. तसेच यावर 43% च्या डिस्काउंटनंतर हा टीव्ही फ्लिपकार्टवर 8,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Infinix Smart TV: या टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही जिओ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह आणि प्राइम व्हिडिओ ॲप्सना सपोर्ट करतो. 16 वॅट साउंड आउटपुट असलेला हा 32 इंचाचा टीव्ही 50 टक्के डिस्काउंटनंतर 8,499रुपयांना खरेदी करू शकता.