AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉल उचलला नाही तरी आवाज येतो, आयफोनमधील बगमुळे जगभरात हाहा:कार

मुंबई : सुपरफास्ट, रॉयल, स्टायलिश, ब्रँडेड आणि सर्वात सुरक्षित अशी नाना विशेषणांचा तोरा मिरवणाऱ्या अॅपल कंपनीवर सध्या सोशल मीडियावरुन तुफान टीका सुरु झाली आहे. आयफोनच्या फेसटाईम अॅपमध्ये बग आढळल्याने, आयफोन युजर्समध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोरील व्यक्तीच्या परवानगीविना फेसटाईमच्या माध्यमातून तिचा आवाज ऐकायला येत असल्याने, फेसटाईमवरील या बगच्या सध्या फेसबुक, ट्विटरसह सर्वच सोशल […]

कॉल उचलला नाही तरी आवाज येतो, आयफोनमधील बगमुळे जगभरात हाहा:कार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

मुंबई : सुपरफास्ट, रॉयल, स्टायलिश, ब्रँडेड आणि सर्वात सुरक्षित अशी नाना विशेषणांचा तोरा मिरवणाऱ्या अॅपल कंपनीवर सध्या सोशल मीडियावरुन तुफान टीका सुरु झाली आहे. आयफोनच्या फेसटाईम अॅपमध्ये बग आढळल्याने, आयफोन युजर्समध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोरील व्यक्तीच्या परवानगीविना फेसटाईमच्या माध्यमातून तिचा आवाज ऐकायला येत असल्याने, फेसटाईमवरील या बगच्या सध्या फेसबुक, ट्विटरसह सर्वच सोशल मीडियावरुन चर्चेचे फड रंगताना दिसत आहेत. अॅपलकडून फेसटाईममधील बग फिक्स्ड करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्याआधी युजर्सचं खासगी आयुष्य धोक्यात घालणाऱ्या अॅपलला सर्वच स्तरातून टीकेला सामोरं जावं लागत आहे.

फेसटाईम काय आहे?

अॅपलच्या आयफोनमध्ये फेसटाईम नावाचे अॅप असते. हे अॅप आयफोनमध्ये इनबिल्ट असते. इंटरनेटच्या मदतीने ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग फ्री करता येतं. तीन जण एकत्र येऊन फेसटाईमवरुन ग्रुप कॉलिंग करु शकतात.

फेसटाईममधील बग काय आहे?

तुमच्या आयफोनमध्ये इनबिल्ट असलेल्या फेसटाईम अॅपवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला काँटॅक्ट्सची यादी दिसते. त्यातून तुम्हाला ज्यांच्याशी ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलिंग करायचं आहे, त्यांच्या काँटॅक्टवर क्लिक करुन, कॉलिंग करु शकता. समोरील व्यक्तीने कॉल रिसिव्ह केल्यानंतर, तुम्ही व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंग सुरु करु शकता. मात्र, यावेळी तुम्ही आणखी एकजणाला कॉलिंगमध्ये जोडू शकता. म्हणजे, कॉन्फरन्सवर घेऊ शकता. तशी आयफोनने फेसटाईममध्ये सुविधा दिली आहे. जास्तीत जास्त तिघांशी एकत्र फेसटाईम कॉलिंग करता येते. मात्र, आता अडचण अशी झालीय की, या बगमुळे तिसऱ्या व्यक्तीला फेसटाईमवर जोडण्यासाठी कॉल केल्यानंतर, समजा तिसऱ्या व्यक्तीने कॉल रिसिव्ह जरी केला नाही, तरी त्या व्यक्तीच्या आयफोनशेजारील आवाज फेसटाईमवर आधीच ग्रुप कॉलिंग करत असणाऱ्यांना येईल.

एकप्रकारे स्पाय किंवा स्नूपिंगसारखा हा प्रकार असल्याने, सोशल मीडियावरुन सध्या जगभरात अॅपलवर टीकेची झोड उठली आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अॅपल कंपनीनेच आयफोनमध्ये असणाऱ्या या बगकडे दुर्लक्ष केल्याने, आयफोन युजर्सच्या खासगी आयुष्यातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आयफोन युजर्स चिंतेत आहेत.

दरम्यान, फेसटाईम अॅपमधील बग दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु असून, सध्या फेसटाईम अॅप आयफोन युजर्सने बंद करावे, असे आवाहन अॅपल कंपनीकडून करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.