
तुम्ही एसी विकत घेण्याचा विचार करता, त्यावेळी तुम्ही एसीला किती स्टार रेटींग आहे मग तो किती वीज बचत करतो ? एसीचा आवाज किती होतो ? एसीचे कुलिंग किती आहे. याचा सर्व गोष्टींसाठी डीलरसाठी पिच्छा पुरवता..परंतू एसी सोबत किती वॉरंटी मिळतीय याची काही खबरबात तुम्हाला आहे की नाही. तुम्हाला माहीती आहे का एसी सोबत एक नाही तर तीन तीन वॉरंटी मिळतात.याची तुम्हाला कदाचित माहीती असेल परंतू नव्वद टक्के लोकांना याची काहीही माहीती नसेल…
तुम्हाला एसी खरेदीवर एकाच प्रकारची वॉरंटी मिळतेय असे वाटत असेल तर तुमचा काही तर गैरसमज झालेला दिसत आहे. किंवा तुम्हाला अपुरी माहीती आहे. एअर कंडीशनर मशिन सोबत एक नव्हे तर तीन-तीन वॉरंटी मिळतेय माहीतीय का ?
एअर कंडीशनर सोबत कंपनी केवळ एक वर्षांची प्रोडक्टस वॉरंटी नाही तर अनेक प्रकारच्या वॉरंटी देत असते. ज्याच्याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती नसते. एक वर्षांच्या प्रोडक्ट वॉरंटीत तुमच्या एसीचा प्रत्येक पार्ट कव्हर होतो.
प्रोडक्ट वॉरंटी तर अनेकांना माहीती असेल परंतू कंपनी ग्राहकांना कॉम्प्रेसरवर देखील वॉरंटी ऑफर करते. काही कंपन्या पाच वर्षांची तर काही कंपन्या १० वर्षांची देखील वॉरंटी देतात. ऑनलाईन एसी खरेदी करताना या बाबीचा नक्की विचार करून नीट तपासणी करा की एसीच्या कॉम्प्रेसरची किती वर्षांची वॉरंटी मिळत आहे.
जर ऑफलाईन स्टोअर मधून एसी खरेदी करत असाल तर एसी विक्रेत्याला या बाबत नक्की विचारणा करा. जर एक वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी संपली तर तुम्ही एसीचा कॉम्प्रेसर खराब झाला असेल तर तुमच्या खिशातून पैसे खर्च करण्याआधी कॉम्प्रेसरला किती वॉरंटी मिळणार आहे याची माहीती आधी घ्या..
प्रोडक्ट आणि कॉम्प्रेसर वॉरंटीच्या व्यतिरिक्त एसी बनविणाऱ्या कंपन्यांतर्फे PCB वॉरंटी देखील दिली जाते. सर्वसाधारणपणे पीसीबीवर कंपन्या ५ वर्षांच्या वॉरंटीचा फायदा देतात. अशात जर समजा तुमच्या एसीची एक वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी संपली आणि नंतर एसीच्या पीसीपबी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर वॉरंटी माहीती झाल्यास तुमचा फायदा होईल.