बहुप्रतीक्षित Amazfit GTR 2 स्मार्टवॉच लाँच, 38 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत फक्त…

बहुप्रतिक्षित Amazfit GTR 2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच सध्या तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन ई-कॉमर्स साईट्सवरुन खरेदी करु शकता.

बहुप्रतीक्षित Amazfit GTR 2 स्मार्टवॉच लाँच, 38 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 4:08 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित Amazfit GTR 2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच सध्या तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन ई-कॉमर्स साईट्सवरुन खरेदी करु शकता. या वॉचसोबत कंपनीकडून 1799 रुपये किंमतीची एक स्ट्रॅपदेखील दिली जात आहे. नव्या फिटनेस ट्रॅकरमध्ये एमोलेड पॅनलही देण्यात आलं आहे. या वॉचमध्ये तुम्हाला 12 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. (Amazfit GTR 2 smartwatch unveiled in India for Rs 12999; check specs and features)

कंपनी हे स्मार्टवॉच दोन वेगवेगळ्या एडिशन्समध्ये विकत आहे. लेटेस्ट Amazfit GTR 2 स्पोर्ट्स एडिशनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर क्लासिक एडिशनची किंमत 13,499 रुपये इतकी आहे. 17 डिसेंबरपासून या वॉचची शिपिंग सुरु होईल. ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे या स्मार्टवॉचवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळवू शकतात.

या स्मार्टवॉचवर ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. 445 रुपये प्रतिमहिना इतक्या ईएमआयवर तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करु शकता. दरम्यान कंपनीने अजून दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. अमेजफिट GTS 2 (Amazfit GTS 2) आणि अमेजफिट GTS 2 मिनी (Amazfit GTS 2 mini) या नावांचे दोन स्मार्टवॉच कंपनीने लाँच केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Amazfit GTR 2 मध्ये 1.39 इंचांचा एमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 326ppi डेन्सिटी आणि 450 nits पिक ब्राईटनेस देतो. अमेजफिटने या स्मार्टवॉचमध्ये 417mAh क्षमेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी तब्बल 14 दिवस टिकते. जर तुम्ही पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करत असाल तर हिच बॅटरी तब्बल 38 दिवस टिकू शकते.

या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला एक्सेलेरोमीटर, एयर प्रेशर सेन्सर, एंबियन्ट लाईट सेन्सर आणि गायरोस्कोप देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये 12 प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 3 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. तसेच यामध्ये बिल्ट इन माइक्रोफोन स्पीकर देण्यात आला आहे. हे वॉच कॉल फंक्शन, जीपीएस, एनएफसी, वायफाय आणि ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल.

मोबाईलनंतर Realme च्या Smartwatch चा धुमाकूळ, देशात सर्वाधिक विक्री

चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी रियलमी (Realme) उत्तमोत्तम स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीजच्या जोरावर भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. रियलमीने आधी स्मार्टफोन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आणि आता स्मार्टवॉचच्या (Smartwatch) विक्रीतही रियलमीने इतर कंपन्यांना मागे टाकले आहे.

रियलमी कंपनीने सप्टेंबर महिन्यात भारतात सर्वाधिक स्मार्टवॉचची विक्री केली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने (IDC) वियरेबल्स डिव्हाईसच्या मासिक विक्रीबाबतचा एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात भारतात जितक्या स्मार्टवॉचची विक्री झाली आहे, त्यात रियलमीचा वाटा सर्वात मोठा आहे. देशातील एकूण विक्रीपैकी 22.1 टक्के स्मार्टवॉच रियलमीचे होते.

मार्केटमध्ये रियलमीचा हिस्सा वाढला

मागील सहा महिन्यांमध्ये रियलमीच्या स्मार्टवाचच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये रियलमीच्या शिपमेंटमध्ये लागोपाठ दुसऱ्या तिमाहीत मोठी वाढ दिसून आली आहे. स्मार्ट वियरेबल्स मार्केटमध्ये एप्रिल ते जून दरम्यान रियलमीचा 21.3 टक्के हिस्सा होता, तर जुलै ते सप्टेंबरमध्ये कंपनीचा हिस्सा 22.1 टक्के इतका होता.

विक्री वाढण्याचे कारण काय?

रियलमीच्या स्मार्टवॉचच्या विक्रीत वाढ होण्यामागे कमी किंमत आणि जबरदस्त फिचर ही दोन प्रमुख कारणं आहेत. कंपनी सातत्याने कमी किंमतीत स्मार्टवॉच लाँच करत आहे आणि ते स्मार्टवॉच लोकांच्या पसंतीसही उतरत आहेत. रियलमीच्या स्वस्तातल्या Realme Fashion Watch पासून महागडच्या Realme Classic Watch पर्यंत सर्वच स्मार्टवॉचना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या

Xiaomi ची अ‍ॅपलला टक्कर, Mi Watch Lite लाँच, जाणून घ्या फिचर्स

जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच, किंमत फक्त…

(Amazfit GTR 2 smartwatch unveiled in India for Rs 12999; check specs and features)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.