जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच, किंमत फक्त…

टायमेक्स कंपनीने नुकताच एक फिटनेस बँड लाँच केला आहे. या फिटनेस बँडमध्ये पाच दिवसांचा बॅटरी बँकअप देण्यात आला आहे.

जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच, किंमत फक्त...

मुंबई : Timex कंपनी भारतात त्यांच्या व्यवसायाच्या कक्षा अजून रुंद करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने नुकताच एक फिटनेस बँड (Fitness Band) लाँच केला आहे. या फिटनेस बँडमध्ये पाच दिवसांचा बॅटरी बँकअप देण्यात आला आहे. तसेच सिलिकॉन स्ट्रॅपही देण्यात आली आहे. टायमेक्सच्या या फिटनेस बँडची किंमत 4 हजार 495 रुपये इतकी आहे. सध्या हा स्मार्टबँड टायमेक्सच्या वेबसाईटवरुन ऑर्डर करता येईल. लवकरच हा बँड ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Timex Fitness band Launches with upto 5 days battery backup)

Timex Fitness Band मधील फिचर्स

टायमेक्सच्या या स्मार्ट बँडमध्ये तुम्हाला 2.4 cm चा कलर टच डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, म्युझिक कंट्रोल, हार्ट रेट मॉनिटर आणि नोटिफिकेशन अलर्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट बँडमध्ये पाच दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

हा बँड अलॉय केस, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉन स्ट्रॅपसह उपलब्ध आहे. युजर्स दोन कलर व्हेरिएंटमध्ये हा बँड खरेदी करु शकतात. रोज गोल्ड आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्ट बँड उपलब्ध आहे.

Helix गस्टो 2.0

कंपनीने यापूर्वी Helix गस्टो 2.0 हा स्मार्ट बँड यापूर्वीच लाँच केला आहे. याची किंमत 2 हजार 495 रुपये इतकी आहे. हा फिटनेस बँड तुम्हाला दोन रंगांमध्ये मिळेल. यामध्येदेखील अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि हार्ट रेट मॉनिटर हे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये 2.4 cm चा कलर स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच SOS अलर्ट, कॅलरी कंजम्प्शन, डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग फिचरचाही समावेश आहे. Helix गस्टो हा स्मार्टबँड IP55 स्प्लॅश रसिस्टन्टसह लाँच करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील

WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

(Timex Fitness band Launches with upto 5 days battery backup)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI