स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी! Vivo V40 Pro वर १७ हजारांची सूट
विवोचा प्रीमियम स्मार्टफोन विवो व्ही४० प्रो ५जी वर १७ हजारांची सूट दिली जात आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेझॉनकडून स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे. विवोचा प्रीमियम स्मार्टफोन विवो व्ही४० प्रो ५जी वर १७ हजारांची सूट दिली जात आहे. ज्या लोकांना फोटाग्राफीची आवड आहे अशा ग्राहकांसाठी हा फोन फायदेशीर ठरू शकतो. या फोनची किंमत आणि फीचर्स काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
Vivo V40 Pro या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल सेन्सरसह चार कॅमेरे मिळतात. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मागील कॅमेरा सेटअपसह समोर एक कॅमेरा सेन्सर मिळणार आहे. त्यामुळे फोटो काढण्याची हौस असलेल्यांसाठी हा फोन खास असणार आहे. तसेच यामध्ये चांगल्या दर्जाचे व्हिडिओही रेकॉर्ड केले जाऊ शकतात.
Vivo V40 Pro ची किंमत
२५६ जीबी स्टोरेज असलेला Vivo V40 Pro ५जी सध्या अमेझॉनवर ५४,९९९ रुपयांच्या किमतीसह लिस्टेड आहे. Amazon ने या फोनची किंमत ३१% ने कमी केली आहे. या डिस्काउंट ऑफरसह तुम्ही Vivo V40 Pro 5G फक्त ३७,९०० रुपयांना खरेदी करू शकता. Amazon च्या या ऑफरमध्ये तुम्हाला १७,००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे.
या डिस्काउंट ऑफरनंतरही Amazon Vivo V40 Pro 5G खरेदीवर अतिरिक्त ऑफर देत आहे. Amazon ग्राहकांना या फोनवर ११३७ रुपयांची कॅशबॅक ऑफर देखील देत आहे. तसेच काही बँकांच्या कार्डवर १२५० रुपयांपर्यंतची सूट देखील दिली जात आहे. तसेच तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही फायदा घेऊ शकता. Amazon या फोनवर ३५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे. मात्र ही एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.
Vivo V40 Pro स्मार्टफोनमधील फीचर्स
- या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED पॅनल आहे, याचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे.
- हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतो.
- या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९२००+ चिपसेट आहे.
- या फोनमध्ये तुम्हाला १२GB पर्यंत रॅम आणि ५१२GB पर्यंत स्टोरेज मिळते.
- या फोनच्या मागील पॅनलमध्ये ५०+५०+५० मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
- या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ५०-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
- Vivo V40 Pro या फोनमध्ये ५५००mAh बॅटरी देण्यात आली आहे.
- ही फोन ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.