अँजेल वनची वक्रांगी डिजिटल व्हेंचर्ससोबत भागीदारी, बाजारपेठांमधील विस्तारीकरणावर भर

| Updated on: Dec 25, 2021 | 6:00 AM

अँजेल वन लिमिटेड या फिनटेक प्लॅटफॉर्मने वक्रांगी डिजिटल व्हेंचर्स लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. यातून आपल्या भारतइझी सुपर अॅप आणि नेक्स्टजेन केंद्रांद्वारे वक्रांगीच्या ग्राहकांना डिमॅट खाते उघडण्यासाठी मदत केली जाईल.

अँजेल वनची वक्रांगी डिजिटल व्हेंचर्ससोबत भागीदारी, बाजारपेठांमधील विस्तारीकरणावर भर
Angel One
Follow us on

मुंबई : अँजेल वन लिमिटेड या फिनटेक प्लॅटफॉर्मने वक्रांगी डिजिटल व्हेंचर्स लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. यातून आपल्या भारतइझी सुपर अॅप आणि नेक्स्टजेन केंद्रांद्वारे वक्रांगीच्या ग्राहकांना डिमॅट खाते उघडण्यासाठी मदत केली जाईल. (Angel One gains on partnering Vakrangee for expansion)

या भागीदारीच्या माध्यमातून अँजेल वनकडून आपली विविध प्रकारची उत्पादने आणि सेवा देशभरातील ग्राहकांना दिल्या जातील. प्रामुख्याने टीअर 2 व 3 आणि त्यापलीकडील शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल. अँजेल वनला वक्रांगीच्या व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्याद्वारे ज्या बाजारपेठांमध्ये ती पोहोचलेली नाही तिथपर्यंत ती पोहोचू शकेल. कंपनीचे स्मार्ट मनी, डिजिटल ऊर्जाप्राप्त सुयोग्य केवायसी प्रक्रिया, ग्राहक ऑनबोर्डिंग आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत उत्पादने एक चांगला ग्राहक अनुभव देऊ शकतील.

अँजेल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले की, “आम्हाला टायर 2, 2 आणि त्यापलीकडील शहरांमध्ये आमच्या व्यापक अद्ययावत सेवा नवीन युगाच्या गुंतवणूकदारांना देण्यासाठी वक्रांगी डिजिटल व्हेंचर्स लिमिटेडसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. आम्हाला या तंत्रज्ञानावर आधारित भागीदारीबाबत खूप उत्साह आहे, कारण आम्हाला त्यातून जास्तीत-जास्त गुंतवणूकदारांना सहभागी करून घेणे आणि गुंतवणुकीची संस्कृती अधिक सखोल करणे शक्य होईल.”

वक्रांगी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश नंदवाना म्हणाले की, “आम्हाला अँजेल वनसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. एंजेल वनसोबतची ही भागीदारी देशाच्या सर्वांत दुर्गम ठिकाणी असलेल्या आमच्या ग्राहकांना आमच्या डिजिटल व्यासपीठांद्वारे तसेच नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांच्या नेटवर्कद्वारे विविध प्रकारच्या गुंतवणुका आणि वित्तीय सेवा देऊ शकेल. यातून आमच्या ग्राहकांसाठी मूल्य देण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे. ही भागीदारी विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या आमच्या धोरणाला आणखी प्रोत्साहित करेल.”

इतर बातम्या

WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल

(Angel One gains on partnering Vakrangee for expansion)