AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

सध्या वापरलं जाणारं पेमेंट अॅप Google Payनं एक नवीन फिचर आणलंय. कंपनीनं स्प्लिट एक्स्पेन्स (Split an expense) हे फिचर लॉन्च केलंय. गुगलनं या फिचरची घोषणा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या Google for India 2021 या इव्हेंटमध्ये केली होती.

Google Pay New Feature : 'गुगल पे'मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं
गुगल पे
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:32 PM
Share

मुंबई : अनेकदा आपण मित्रांसोबत जेवायला जातो किंवा रोजचे बिल भरतो, त्यावेळी त्याचं विभाजन करून ते बील भरणं थोडं कष्टाचंच काम आहे. यापासून आता सुटका होणाराय. सध्या वापरलं जाणारं पेमेंट अॅप Google Payनं एक नवीन फिचर आणलंय. कंपनीनं स्प्लिट एक्स्पेन्स (Split an expense) हे फिचर लॉन्च केलंय. यामुळे युझर्सना सहजपणे त्यांचे पैसे भरता येणारायत. त्यामुळे आपापसात बोलून, चर्चा करून रक्कम मोजण्याची गरज राहणार नाही. गुगलनं या फिचरची घोषणा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या Google for India 2021 या इव्हेंटमध्ये केली होती.

हे फिचर आता अॅपवर आणलं गेलंय. तसंच त्याचा वापरही तुम्ही करू शकता. Google Pay अॅपमध्येही ते दिसेल, की तुम्ही पैसे भरले की नाही. यामुळे एखादा व्यक्ती पेमेंट करायचं विसरला तर त्यालाशी शोधणं सोपं होईल.

असं करतं काम SplitWise अॅप खर्चाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने थोडा चांगला अनुभव आणि वैशिष्ट्ये ऑफर करतो. Google Pay अॅपवर पे पर्याय दाखवतो. तुम्हाला फक्त स्प्लिट एक्स्पेन्स फीचरवर टॅप करायचंय. अकाऊंट एंटर करायचं आणि इतरांना त्वरित पेमेंटची रिक्वेस्ट मिळेल.

अॅप अपडेट करणं आवश्यक अॅप तुम्हाला पे रिक्वेस्ट बंद करण्याचा पर्यायदेखील देतो. याचा वापर तुम्हाला रोखीनं किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं पेमेंट करण्यासाठी करता येतो. नवीन फिचर वापरण्यासाठी तुम्हाला अॅप अपडेट करणं आवश्यक आहे. तुम्हाला गुगल पेवर स्प्लिट फीचर वापरायचं असेल, तर त्याच्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगतो आहोत.

Google Pay Split an expense कसं वापरावं? 1 : सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि “New Payment”वर टॅप करा. 2 : अॅप तुम्हाला टॉपवर एक सर्च बार आणि स्क्रीनच्या खाली “New Group” ऑप्शन येईल आणि त्या पेजवर तुम्ही जाल. 3 : त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांची नावं याका आणि Nextवर क्लिक करा. 4 : आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव टाकावं लागेल. त्यानंतर तुम्ही “Create” बटणावर टॅप करू शकता, त्यानंतर Group तयार केला जाईल. 5 : आता तुमच्याकडे Google Pay Group आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिलम भरू शकता. यासाठी, फक्त “Split an expense” बटणावर टॅप करणं आवश्यक आहे, आपण खर्च केलेली एकूण रक्कम टाका आणि पुढच्या बटणावर पुन्हा टॅप करा. 6 : मग Google आपोआप रक्कम विभाजित करेल आणि नंतर प्रत्येकाला किती खर्च करायचा आहे ते सांगेल. रिव्ह्यूनंतर, तुम्ही “Send Request” बटणावर टॅप करू शकता. तुम्हाला रक्कम कशासाठी आहे हे सांगण्याचा पर्यायदेखील मिळेल. जेव्हा जेव्हा एखादा सदस्य पेमेंट करतो तेव्हा Google Pay तुम्हाला सूचित करेल आणि पेमेंट ग्राफ अपडेट करेल.

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Atrangi Re Review | सारा-धनुष-अक्षयची ‘चकाचक’ लव्हस्टोरी, वाचा कसा आहे ‘अंतरंगी रे’ चित्रपट…

Grape : अखेर ठरंल तर मग…! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.