Samsung Galaxy Z Fold 7 पेक्षाही स्वस्त असेल iPhone Fold, जाणून घ्या संभाव्य किंमत

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 7 आणि विवो एक्स फोल्ड 5 लाँच झाल्यानंतर आयफोन फोल्डबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता अलीकडेच एक नवीन अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये या आगामी फोल्डेबल फोनच्या किंमतीबद्दल सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

Samsung Galaxy Z Fold 7 पेक्षाही स्वस्त असेल iPhone Fold, जाणून घ्या संभाव्य  किंमत
iphone fold
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 4:50 PM

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत राहतात. त्यातच आता फोल्डेबल स्मार्टफोन्सबद्दल लोकांमध्ये वाढत्या क्रेझमुळे, कंपन्यांनीही यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ आणि व्हिवो एक्स फोल्ड ५ लाँच झाल्यानंतर आता अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या अहवालांमध्ये आगामी आयफोन फोल्डची किंमत लीक झाल्याचे समजत आहे, जर तुम्हालाही आयफोन फोल्डच्या फोनबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोनची संभाव्य किंमत काय असू शकते?

सॅमसंगपेक्षा स्वस्त, विवोपेक्षा महाग असेल आयफोन फोल्ड

फॉर्च्यूनने शेअर केलेल्या यूबीएस अहवालानुसार, अॅपलच्या आगामी फोल्डची किंमत $1800 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे 1,55,084 रुपये ते $2000 डॉलर अंदाजे 1,72,315 रुपये दरम्यान इतकी असू शकते. जर असे झाले तर अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची किंमत सॅमसंगच्या नवीनतम फोल्डेबल फोनच्या किंमतीपेक्षा कमी असेल.

भारतात Samsung Galaxy Z Fold 7 ची किंमत 1,74,999 ते 2,10,999 रुपयांपर्यंत आहे. अर्थात आयफोन फोल्डची किंमत सॅमसंग फोनपेक्षा कमी आहे, परंतु हा फोन Vivo X Fold 5 च्या तुलनेत जास्त असू शकतो, भारतात Vivo च्या या नवीनतम फोल्डेबल फोनची किंमत 1,49,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. UBS विश्लेषकांचा असा विश्वास आहे की प्रोसेसर, मेमरी आणि कॅमेरा यासारख्या घटकांवरील खर्च कमी केल्याने फोनचे उत्पादन स्वस्त होऊ शकते.

iPhone Fold: डिझाइनबद्दल चर्चा

किंमतीव्यतिरिक्त, डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, अशा अफवा आहेत की आयफोन फोल्ड हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात लहान उत्पादन असेल. अॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ आणि इन्स्टंट डिजिटल असे सांगतात की फोल्डेबल आयफोन उघडल्यावर त्याची जाडी फक्त 4.8 मिमी असू शकते. फोल्ड केल्यावर आयफोन फोल्डची जाडी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 7 पेक्षा जास्त असू शकते, अहवालानुसार फोल्ड केल्यावर या फोनची जाडी 8.9 मिमी पर्यंत असू शकते.