मोबाईलमधले बॅकग्राउंड ॲप्समुळे तुमचा फोन हँग होतोय? त्यांना ‘या’ योग्य पद्धतीने करा बंद

बॅकग्राउंड ॲप्स तुमच्या फोनची रॅम आणि डेटा सतत वापरतात. यामुळे तुमचा फोन हँग किंवा लॅग व्हायला सुरूवात होते. पण या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर काही सोप्या सेटिंग्ज बदलून ही समस्या टाळता येते.

मोबाईलमधले बॅकग्राउंड ॲप्समुळे तुमचा फोन हँग होतोय? त्यांना या योग्य पद्धतीने करा बंद
mobile hang
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 15, 2025 | 9:43 PM

आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तसेच आपल्या दैंनदिन गोष्टींसाठी देखील आपण मोबाईलवर अवलंबून आहोत. पण हाच मोबाईल फोन कधीकधी अचानक हँग होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही कारणाशिवाय स्लो झाला असेल, तर बॅकग्राउंड ॲप्स हे त्यामागचं मुख्य कारण असू शकतं. हे अ‍ॅप्स स्क्रीनवर दिसत नाहीत परंतु सतत बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात. यामुळे रॅम, प्रोसेसर आणि बॅटरीवर मोठा भार पडतो. त्यामुळे तुम्ही जर हे बॅकग्राउंड ॲप्स योग्य पद्धतीने मॅनेज केल्याने फोनचा वेग आणि बॅटरी लाइफ दोन्ही सुधारू शकतात.

बॅकग्राउंड ॲप्समुळे फोन कसा काय हँग होतो?

बॅकग्राउंड ॲप्स सतत रॅम आणि सीपीयू वापरतात, ज्यामुळे फोनला नवीन टास्कसाठी कमी रिसोर्स शिल्लक राहते. अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये इंटरनेट डेटा वापरतात ज्यामुळे मोबाईल सिस्टमवर आणखी ताण येतो. तर नोटिफिकेशन, लोकेशन आणि सिंक सेवा देखील प्रोसेसरलस व्यस्त ठेवतात, ज्यामुळे याचा परिणाम फोनचा वेग आणि स्मूथनेसवर थेट होतो.

बॅटरी आणि डेटावरही परिणाम होतो

बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स बॅटरी जलद संपवतात. हे अ‍ॅप्स डेटा सिंक करण्यासाठी वारंवार सर्व्हरशी कनेक्ट होतात, ज्यामुळे जास्त मोबाइल डेटा देखील वापरला जातो. जेव्हा बॅटरी कमी असते तेव्हा फोन आपोआप परफॉर्मन्स मर्यादित करतो, म्हणूनच फोन आणखीन स्लो चालतो.

अँड्रॉइडमध्ये बॅकग्राउंड ॲप्स योग्य पद्धतीने कसे बंद करायचे?

अँड्रॉइड फोनच्या Settings मधील Battery किंवा Apps सेक्शनमध्ये जाऊन Background Usage नियंत्रित केला जाऊ शकतो.

यातुन तुम्ही अनावश्यक ॲप्ससाठी बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी मर्यादित करू शकता. सिस्टम सेटिंग्जमधून ॲप परमिशन मॅनेज करणे हा क्लीनर ॲप्स वारंवार वापरण्यापेक्षा स्थिर फोन स्पीड राखण्याचा एक सुरक्षित आणि अधिक प्रभावी मार्ग आहे.

आयफोनवर बॅकग्राउंड ॲप्स कसे नियंत्रित करावे?

आयफोनमध्ये Background App Refresh फिचर्स बॅकग्राउंड ॲप्स नियंत्रित करते. सेटिंग्जमध्ये जाऊन Background App Refresh पर्याय निवडून, तुम्ही फक्त आवश्यक ॲप्स चालू ठेवू शकता. शिवाय लोकेशन आणि नोटिफिकेशन परमिशन मर्यादित केल्याने फोनची कार्यक्षमता देखील सुधारते. अ‍ॅपलची प्रणाली स्वतः ॲप्स मॅनेज करते, म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहणे योग्य नाही.