
बँक एफडी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण, अनेकांना हा प्रश्न असतो की, बँक एफडी की कॉर्पोरेट एफडी, यापैकी काय योग्य. तर याचविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. बँक एफडीव्यतिरिक्त कॉर्पोरेट एफडी हा देखील गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण कॉर्पोरेट एफडीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या एफडीवर पैसे गुंतवण्यासाठी जास्त परतावा मिळू शकतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
असे अनेक लोक आहेत जे आपले पैसे गुंतवण्यासाठी बँक एफडीचा आधार घेतात. बँक एफडी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे एफडीमधील पैशांची सुरक्षितता आणि उपलब्ध निश्चित परतावा. बँक एफडीव्यतिरिक्त कॉर्पोरेट एफडी हादेखील गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण कॉर्पोरेट एफडीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या एफडीवर पैसे गुंतवण्यासाठी जास्त परतावा मिळू शकतो. चला जाणून घेऊया.
कॉर्पोरेट एफडी
बँकांमध्ये ज्या प्रकारे बँक एफडी दिली जाते, त्याच प्रमाणे कॉर्पोरेट कंपन्यांकडून कॉर्पोरेट एफडी दिली जाते म्हणजेच ही एफडी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून दिली जाते. कॉर्पोरेट एफडी बँक एफडीप्रमाणेच असतात परंतु कॉर्पोरेट एफडीवर बँक एफडीपेक्षा जास्त व्याज दर असतात.
कॉर्पोरेट एफडीमध्ये चांगला परतावा मिळेल?
कॉर्पोरेट एफडीमधील परतावा बँक एफडीपेक्षा जास्त असतो, परंतु कॉर्पोरेट एफडी बँक एफडीइतके सुरक्षित नसतात. वास्तविक या एफडी कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जात असल्याने कॉर्पोरेट एफडीमध्ये पैसे गमावण्याची भीती असते. अशावेळी कंपनीच्या तोट्यामुळे तुमच्या एफडीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय कंपनीची आर्थिक स्थिती तुमच्या एफडीवर परिणाम करू शकते. त्याचबरोबर कॉर्पोरेट एफडी तोडणे देखील बँक एफडीपेक्षा कठीण आहे.
कॉर्पोरेट किंवा बँक एफडी : कोणती चांगली आहे?
जर तुम्ही जास्त परतावा मिळवण्यासाठी जोखीम घेऊ शकता तर तुम्ही तुमचे पैसे कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवू शकता. मात्र, कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा नक्की तपासा. याशिवाय जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही तुमचे पैसे बँकेच्या एफडीमध्ये गुंतवू शकता.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)