रिअलमीचा ‘हा’ नवीन स्मार्टफोन लाँच होण्याआधीच किंमत आणि फीचर्स झाले लीक, जाणून घ्या

Realme कंपनीचा हा नवीन फोन ४ डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँच होण्याआधीच फोनची किंमत, रॅम आणि स्टोरेज बद्दलची माहिती लीक झाली आहे. चला या फोनची लीक झालेली किंमत आणि पुष्टी झालेल्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

रिअलमीचा हा नवीन स्मार्टफोन लाँच होण्याआधीच किंमत आणि फीचर्स झाले लीक, जाणून घ्या
Realme
Updated on: Dec 03, 2025 | 2:05 PM

रियलमी कंपनीचा Realme P4x 5G हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत भव्य पदार्पण करणार आहे. मात्र हा स्मार्टफोन 4 डिसेंबर रोजी लाँच होण्याआधीच या आगामी स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. केवळ किंमतच नाही तर रॅम आणि स्टोरेजशी संबंधित माहिती देखील लीक झाली आहे. फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Realme.com वर या फोनसाठी एक वेगळी मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. लाँच होण्याआधीच कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल याची पुष्टी झाली आहे. जर तुम्ही देखील या Realme फोनची वाट पाहत असाल, तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की कंपनी हा हँडसेट कोणत्या किंमतीला लाँच करू शकते.

Realme P4x 5G ची लीक झालेली भारतातील किंमत

टिपस्टर यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की या फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 मध्ये तर 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 17,499 मध्ये आणि 8GB/256GB टॉप व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 19,499 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनसोबत Realme Watch 5 देखील लाँच केला जाईल, याची मात्र किंमत अद्याप सांगितलेली नाही.

 

 

Realme P4x 5G अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

या हँडसेटमध्ये एआय-आधारित 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा सेन्सर असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या रियलमी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5जी प्रोसेसर, 18 जीबी पर्यंत डायनॅमिक रॅम असेल. या फोन 45 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी देखील असेल. हा फोन 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेससह देखील लॉन्च होईल.

Realme P4x 5G ची अपेक्षित फीचर्स

संभाव्य फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme P4x 5G मध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.72-इंचाचा डिस्प्ले असेल आणि तो 2-मेगापिक्सेलच्या दुय्यम रियर कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल.