AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhairu Baba : काजू, बदाम, दूध अन्… दोन JCB च्या मदतीने तयार केला 800 क्विंटल प्रसाद, भैरू बाबाच्या यात्रेची देशात चर्चा!

राजस्थानमध्ये भैरू बाबाच्या यात्रेत साधारण तीन लाख भाविकांसाठी तब्बल 700 क्विंटलचा चुरमा प्रसाद तयार करण्यात आला आहे. चक्क दोन जेसीबींच्या मदतीने हा प्रसाद तयार करण्यात आला आहे.

Bhairu Baba : काजू, बदाम, दूध अन्... दोन JCB च्या मदतीने तयार केला 800 क्विंटल प्रसाद, भैरू बाबाच्या यात्रेची देशात चर्चा!
bhairu baba yatraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 29, 2026 | 8:37 PM
Share

राजस्थानमधील कोटपुतली भागातील कोहडा गावात एक प्रसिद्ध भैरू बाबा मंदिर आहे. या मंदिराची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच येथे दरवर्षी 30 जानेवारी रोजी मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या अगोदर 29 जानेवारी रोजी मोठी कलश यात्रा काढली जाते. आता हीच यात्रा आणि भैरू बाबा मंदिराची एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. या यात्रेतील भाविकांसाठी तब्बल 800 क्विंटलचा चूरमा प्रसाद तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चक्क जेसीबीच्या मदतीने हा चुरमा तयार करण्यात आला असून या प्रक्रियेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

800 क्विंटल चुरमा केला जातो तयार

मिळालेल्या माहितीनुसार भैरू बाबा मंदिराची यंदाची ही 17 वी यात्रा आहे. या यात्रेतील भाविकांना प्रसाद म्हणून चुरमा दिला जाणार आहे. हाच चुरमा तयार करण्यासाठी चक्क दोन-दोन जेसीबींची मदत घेण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल 800 क्विंटल चुरमा प्रसाद तयार करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र चुरमा प्रसाद तयार करण्याचा हा नवा विक्रम असल्याचे बोलले जात आहे.

मनातील इच्छा होते पूर्ण

या मंदिरात भैरु महाराजांची एक मूूर्ती आहे. त्या परिसरातील लोकांची या भैरू महाराजांवर खूप श्रद्धा आहे. भैरू बाबांच्या आशीर्वादामुळे सर्व प्रकारची संकटं दूर होतात तसेच मनातील इच्छा पूर्ण होते, असे भक्तगण म्हमतात. त्यामुळेच या यात्रेला दरवर्षी सवाई माधोपूर, ग्वालियर, झालावाड, कोटा, मुरैना या भागातून तसेच मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील भाविकदेखील या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन तेथील स्थानिक लोक पाहातत.

स्थानिक लोकच एकत्र येऊन तयार करतात चुरमा

यात्रेसाठी मंदिराच्या आसपासची गावे एकत्र येऊन भाविकांसाठी भंडारा, प्रसादाची तजवीज करतात. तसेच सफाई, स्वच्छता, वाहतुकीची या लोकांकडून कालजी घेतली जाते. चुरमा प्रसाद तयार करण्यासाठी इथे कोणालाही पैसे दिले जात नाहीत. स्थानिक लोकच एकत्र येऊन हा प्रसाद तयार करतात. चुरमा करताना दूध, तूप, मनुके, काजू, बदाम यांचा वापर केला जातो. हा प्रसाद साधारण तीन लाख भाविकांना दिला जातो.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.