आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन काही मिनिटांत करा सिलेंडर बुक

| Updated on: Apr 04, 2021 | 8:54 AM

इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही अगदी सहज एलपीजी सिलिंडरचा दिलेला नंबर सेव्ह करुन एलपीजी सिलेंडर बुक करू शकता. (Book a cylinder in a few minutes from WhatsApp at home)

आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन काही मिनिटांत करा सिलेंडर बुक
आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन काही मिनिटांत करा सिलेंडर बुक
Follow us on

नवी दिल्ली : आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही अगदी सहज एलपीजी सिलिंडरचा दिलेला नंबर सेव्ह करुन एलपीजी सिलेंडर बुक करू शकता. (Book a cylinder in a few minutes from WhatsApp at home)

इंडेन युजर्सना या नंबरवर करावे लागेल व्हॉट्सअप

आपण इंडेनचे ग्राहक असाल तर आपण 7718955555 वर कॉल करून आपले सिलिंडर बुक करू शकता. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरुन बुकिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 7588888824 वर रिफिल (REFILL) लिहून मॅसेज पाठवावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बुकिंगची माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही एसएमएसद्वारे एलपीजी गॅस सिलिंडरदेखील बुक करू शकता. यामध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) मिळेल. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दाखवून तुम्ही सिलिंडर मिळवू शकता.

HP Gas युजर्सला या WhatsApp नंबरवर करावा लागेल मॅसेज

आपण एचपी गॅस सिलिंडर बुक करू इच्छित असल्यास प्रथम आपल्या फोनमध्ये 9222201122 नंबर सेव्ह करा. असे केल्यावर, या क्रमांकाचा चॅट बॉक्स उघडा आणि BOOK टाईप करुन मॅसेज करा. हे केल्यावर, आपल्याला काही माहिती विचारली जाईल आणि आपले गॅस सिलिंडर बुक केले जाईल. यातून तुम्हाला इतर एलपीजी(LPG) कोटा, एलपीजी(LPG) आयडी, एलपीजी(LPG) सबसिडी इत्यादी बाबींविषयीही माहिती मिळू शकेल.

WhatsApp वरुन Bharatgas सिलेंडर असा करा बुक

जर आपल्याला भारतगॅस सिलेंडर बुक करायचे असेल तर आपल्याला आपल्या फोनमध्ये 1800224344 नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन हा नंबर ओपन करा आणि मग बुक(BOOK) किंवा 1 लिहून मेसेज करा. यानंतर, आपले सिलिंडर बुक केले जाईल आणि आपल्या व्हॉट्सअपवर एक पुष्टीकरण मॅसेज येईल. लक्षात ठेवा की आपल्याला केवळ आपल्या नोंदणीकृत क्रमांकावरून संदेश पाठवावा लागेल.

कसा जाणून घ्याल स्टेटस?

जर आपले बुकिंग केले गेले आहे आणि आपल्याला स्टेटस जाणून घेऊ इच्छित असाल तर व्हॉट्सअप सेवेवरही ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला STATUS # टाईप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला आरक्षित क्रमांक मिळेल जे तुम्हाला बुकिंगनंतर मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमचा बुकिंग क्रमांक 12345 असेल तर आपणास STATUS # 12345 आणि 7588888824 क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करावा लागेल. हे लक्षात ठेवा की STATUS # आणि ऑर्डर नंबरमध्ये कोणतीही स्पेस द्यायची नाही. (Book a cylinder in a few minutes from WhatsApp at home)

संबंधित बातम्या

ही प्रसिद्ध कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी

जबरदस्त फीचर्ससह Realme X7 Pro चं एक्सट्रीम एडिशन लाँच, किंमत…