Jio, Airtel आणि Vi ला टक्कर देण्यासाठी BSNL चा ढासू प्लॅन लाँच

| Updated on: Dec 21, 2020 | 6:48 PM

अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी BSNL कंपनी सज्ज झाली आहे.

Jio, Airtel आणि Vi ला टक्कर देण्यासाठी BSNL चा ढासू प्लॅन लाँच
Follow us on

मुंबई : अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी BSNL कंपनी सज्ज झाली आहे. BSNL कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी नुकताच 251 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही कॉलिंग अथवा एसएमएस बेनिफिटशिवाय केवळ 70 जीबी डेटा मिळेल. (BSNL launches Rs 251 prepaid plan with 70GB data to compete with Jio, Airtel and Vi)

BSNL ने या प्लॅनसोबत अजून एक 151 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच कंपनीने सर्वात स्वस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. 10 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा दिला जात असून या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 56 रुपये मोजावे लागणार आहेत. बीएसएनएलचे हे प्लॅन्स इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहेत.

देशात जियो कंपनी सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स देते असा लोकांचा गेल्या काही महिन्यांपासूनचा समज आहे. परंतु बीएसएनल कंपनी त्याला छेद देण्याच्या तयारीत आहे. कारण बीएसएनएल कंपनी 251 रुपयांमध्ये 70 जीबी डेटा देत आहे. तर रिलायन्स जियो 251 रुपयांमध्ये युजर्सना केवळ 50 जीबी डेटा देते. जियोच्या या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्येदेखील कॉलिंग अथवा एसएमएसची सुविधा दिली जात नाही.

जियोप्रमाणे एअरटेल कंपनीदेखील 251 रुपयांमध्ये केवळ 50 जीबी डेटा देते. परंतु या प्लॅनची कोणतीही वैधता नाही. कमी डेटा आणि वैधता अधिक हवी असलेल्या युजर्ससाठी हा प्लॅन चांगला आहे. जियो आणि एअरटेलप्रमाणे वी (वोडाफोन आयडिया) कंपनीदेखील 251 रुपयांमध्ये केवळ 50 जीबी डेटा देते. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. त्यामुळे या चारही प्लॅन्समध्ये बीएसएनएलचा प्लॅन बेस्ट आहे, असे आपण म्हणू शकतो.

84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा हवाय?

एअरटेल (Airtel)

एअरटेल कंपनी 698 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच तुम्हाला एयरटेल एक्सट्रिम प्रीमियम, मोफत हॅलो ट्युन्स, विन्क म्युझिक आणि 150 रुपयांचा फास्टॅग कॅश मिळेल.

बीएसएनएल (BSNL)

बीएसएनएल कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. यामध्ये तुम्हाला दररोज 250 मिनिटं FUP लिमिट आहे. या प्रीपेड प्लॅनद्वारे तुम्ही मोफत कॉलर ट्युनही सेट करु शकता.

रिलायन्स जियो (Reliance Jio)

जियो कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 84 दिवसांसाठी 2 जीबी डेटा दिला जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नेट कॉलिंग आणि जियो टू नॉन जियो कॉलिंगदेखील मिळेल. याची FUP लिमिट 3000 मिनिटं इतकी आहे. तसेच यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच सर्व प्रकारचे जियो अॅप्स मोफत वापरता येतील.

Vi वोडाफोन आयडिया (VI : Vodafone Idea)

Vi कंपनी 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 4 जीबी डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्सची सुविधा मिळेल. सोबतच दररोज 100 लोकल आणि नॅशनल एसएमएस पाठवता येतील.

प्रीपेड प्लॅन्सचा विचार करत असाल तर रिलायन्स जियो आणि बीएसएनलचा प्लॅन सर्वोत्तम आहे. दोन्ही कंपन्या 599 रुपयांमध्ये 84 दिवस डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहेत. याच प्लॅनसाठी एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्या 100 रुपये अधिक घेत आहेत.

संबंधित बातम्या

Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

(BSNL launches Rs 251 prepaid plan with 70GB data to compete with Jio, Airtel and Vi)