525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

बीएसएनएलने (BSNL) त्यांच्या फायबर कस्टमर्ससाठी दोन नवे प्लॅन लाँच केले आहेत.

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 11:38 PM

मुंबई : बीएसएनएलने (Bharat Sanchar Nigam Limited) त्यांच्या फायबर कस्टमर्ससाठी दोन नवे प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स सुरुवातीला हरियाणा आणि ओदिशामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केले होते. आता हे प्लॅन्स BSNL कडून सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. (BSNL Introduces Rs 525 and Rs 600 Bharat fiber plans offering 400gb and 300gb data with 40mbps speed)

300 जीबी CUL CS436 आणि 400 जीबी 525 प्लॅन अशी या दोन प्लॅन्सची नावं आहेत. तसेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने मोफत सिम कार्ड देण्याची घोषणा केली आहे. या नव्या ऑफर्सद्वारे कंपनी एयरटेल, जियो आणि वोडाफोन-आयडियासह (VI) इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

400GB 525 प्लान

हा प्लॅन केवळ एक महिन्यासाठी आहे. यामध्ये युजरला 25Mbps च्या स्पीडसह 400 GB डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन युजर दर महिन्याला 525 रुपये देऊन खरेदी करु शकतो. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट 1 Mbps स्पीडने सुरु राहील. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा पॅक तुम्हाला वर्षभरासाठी खरेदी करायचा असेल तर 6300 रुपये भरुन तुम्ही हा वार्षिक प्लॅन खरेदी करु शकता.

300GB CUL CS346 प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 40 Mbps च्या स्पीडसह 300 जीबी डेटा दिला जाणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्ही 2 Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरु शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा पॅक तुम्ही दर महिन्याला 600 रुपये देऊन खरेदी करु शकता. जर हा प्लॅन तुम्हाला सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्षांसाठी खरेदी करायचा असल्यास तुम्हाला 3600, 7200 किंवा 14,400 रुपये द्यावे लागतील.

BNSL चं सिमकार्ड मोफत कसं मिळणार?

प्रत्येक टेलिकॉम कंपनी नवीन सिम कार्डच्या बदल्यात थोडंफार शुल्क आकारते. हे शुल्क FRC (First Recharge) मध्ये समाविष्ट केलेलं असतं. BSNL चं सिम मोफत हवं असल्यास तुम्हाला सुरुवातीला 100 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. देशभरात सर्वत्र ही ऑफर उपलब्ध आहे. तर बीएसएनएल ग्राहक त्यांच्या जवळच्या बीएसएनएल स्टोरमध्ये जाऊन मोफत सिम कार्ड घेऊ शकतात आणि त्यांच्या पसंतीने रिचार्ज करु शकतात.

संबंधित बातम्या 

Airtel कडून 3 महिन्यांचं फ्री YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फेसबुक आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करणार

(BSNL Introduces Rs 525 and Rs 600 Bharat fiber plans offering 400gb and 300gb data with 40mbps speed)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.