AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

ही ऑफर Oppo ने मर्यादित कालावधीसाठी सादर केली आहे, ज्यात आपण 11 मे ते 17 मे दरम्यान मोठे डिस्काउंट मिळवू शकता.

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?
Oppo Deals
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 11, 2021 | 7:15 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) सोमवारी आपला ई-स्टोअर प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, ज्यावर आपण अनेक उत्तम ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही अनेक ढासू स्मार्टफोन, इअरबड्स, स्मार्ट बँड इत्यादी वस्तू मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. (Buy oppo smartphone with 80 percent discount from oppo E-Store and get 1 Rupee deal also)

ही ऑफर Oppo ने मर्यादित कालावधीसाठी सादर केली आहे, ज्यात आपण 11 मे ते 17 मे दरम्यान मोठे डिस्काउंट मिळवू शकता. बजेट आणि प्रीमियम स्मार्टफोनसह आपण ओप्पो ई-स्टोअरमधून 80 हून अधिक उत्पादने खरेदी करू शकता. यामध्ये IoT प्रॉडक्ट्स आणि वियरेबल्सचाही समावेश आहे.

स्मार्टफोन्सवर 80 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट

ओप्पोच्या स्टोअरमधून फोन विकत घेण्याचे अनेक फायदे आहेत. Oppo A5 2020, Oppo A5s, Oppo F11, Oppo F15 आणि Oppo Reno 10x Zoom सारख्या स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. याशिवाय, Buy बंडल ऑफर देखील देण्यात आली आहे, ज्यात तुम्हाला Oppo Reno 5 Pro आणि Oppo W31, Oppo F19 आणि Oppo 31, Oppo A15s आणि Oppo W11 आणि Oppo F17 Pro आणि Oppo W11 चं कॉम्बिनेशन खरेदी केल्यास 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

10% इन्स्टंट डिस्काऊंट आणि EMI चा लाभ

कंपनी आपल्या ई-स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नो-कॉस्ट EMI पासून अनेक प्रकारच्या ऑफर देत आहे. यासाठी कंपनीने HDFC, स्टँडर्ड चार्टर्ड, कोटक आणि बजाज फायनान्स या प्रमुख बँकांशी भागीदारी केली आहे. त्याशिवाय HDFC, कोटक आणि स्टँडर्ड चार्टर्डच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्यावर तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

1 रुपयात स्मार्टफोन आणि बँड

ओप्पोने एक रुपयाची फ्लॅश डीलदेखील सुरू केली आहे ज्यामध्ये ग्राहक Oppo W31, Oppo W11 आणि Oppo Band Style सारखे वियरेबल आयटम्स खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त कंपनीने 1 रुपये किंमतीचा एक मिस्ट्री बॉक्स देखील सादर केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला Oppo F19 Pro+ ते ओप्पो बँड स्टाईलपर्यंतचे प्रोडक्ट्स मिळू शकतील. यासह तुम्ही ओप्पोच्या लकी ड्रॉमध्येदेखील सहभागी होऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला OPPO Reno5 Pro, OPPO A53, OPPO ENCO X आणि Oppo Band मिळू शकतो.

इतर बातम्या

iPhone 12 सिरीजवर तगडा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

1 जूनपासून Google च्या ‘या’ सर्व्हिससाठी पैसे मोजावे लागणार

(Buy oppo smartphone with 80 percent discount from oppo E-Store and get 1 Rupee deal also)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?