iPhone 12 सिरीजवर तगडा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Flipkart Apple Days sale मध्ये आयफोन 12 खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक ग्राहकांसाठी खास ऑफर सादर करण्यात आल्या आहेत.

iPhone 12 सिरीजवर तगडा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
आयफोन 13 मध्ये अॅपल जोडू शकते हे जबरदस्त वायफाय फिचर

मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटवर सध्या अ‍ॅपल डेज सेल (Apple Days Sale) लाईव्ह करण्यात आला आहे. यात आयफोन 12 सिरीजमधील स्मार्टफोन खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक ग्राहकांसाठी खास ऑफर सादर करण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टवरील पाच दिवसांच्या अॅपल डेज सेलमध्ये आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्ससाठी इन्स्टंट डिस्काऊंट ऑफर सादर करण्यात आली आहे. (Flipkart Apple Days sale : Get huge discounts on iPhone 12 Series)

नवीन आयफोन 12 मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट डिस्काऊंट ऑफरचा लाभ घेता येईल. तुम्ही आयफोन 12 मॉडेल विकत घेण्यासाठी प्रतीक्षा करत असाल तर ही कदाचित ही तुमच्यासठी उत्तम संधी असू शकते. अॅपल डेज सेल दरम्यान फ्लिपकार्ट आयफोन 12 हा स्मार्टफोन 71,900 रुपये किंमतीत विकत आहे, या फोनच्या 64 जीबी स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे.

एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे ग्राहकांना आयफोन 12 च्या खरेदीवर 6,000 रुपयांची त्वरित सवलत मिळू शकते. ही त्वरित सवलत ऑफर 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल्सवरही उपलब्ध आहे. येथे नोंद घेण्यासारखा प्रमुख मुद्दा म्हणजे 71,900 रुपयांच्या ऑफरमध्ये एचडीएफसी कार्ड वापरुन केलेल्या खरेदीवर लागू असलेली त्वरित सवलत समाविष्ट आहे.

iPhone 12 Mini

आयफोन 12 मिनी 61,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर त्याची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. मिनी व्हेरिएंट एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 6,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंट ऑफरसह देखील उपलब्ध आहे. इच्छुक ग्राहक 128 जीबी व 256 जीबी मॉडेल्सच्या खरेदीवर 6,000 रुपयांची तात्काळ सूट घेऊ शकतात.

iPhone 12 Pro

दुसरीकडे आयफोन 12 प्रो 128GB जीबी स्टोरेज मॉडेलच्या 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर त्वरित सवलत देण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 1,10,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही जर HDFC बँकेचं कार्ड वापरुन व्यवहार केला तर तुम्हाला 5,000 रुपयांचा इन्स्टंड डिस्काऊंट मिळेल. ही ऑफर या फोनच्या 256 जीबी आणि 512 जीबी अशा दोन्ही व्हेरिएंट्सवर उपलब्ध आहे.

iPhone 12 Pro Max

टॉप-ऑफ-द-लाइन आयफोन 12 प्रो मॅक्स मॉडेल 128 जीबी मॉडेल 1,20,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Apple डेज सेल दरम्यान त्वरित सवलत देण्यात आली आहे, या स्मार्टफोनची मूळ किंमत 1,29,900 रुपये इतकी आहे. आयफोन 12 प्रो मॅक्स एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे खरेदीवर त्वरित 5,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

इतर iPhone वरही ऑफर

फ्लिपकार्ट वर Apple डेज सेल मध्ये iPhone 11 सह इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट मिळेल. यामध्ये iPhone 11 48,999 रुपये, iPhone XR 36,999 रुपये, iPhone SE 128GB मॉडल 33,999 रुपये आणि iPhone 11 Pro 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन कंपन्या तोट्यात, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार

नवीन स्मार्टफोन दीर्घकाळ टिकवायचा आहे? मग या टिप्स नक्की वाचा

(Flipkart Apple Days sale : Get huge discounts on iPhone 12 Series)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI