1 जूनपासून Google च्या ‘या’ सर्व्हिससाठी पैसे मोजावे लागणार

आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक अधिकृत मेल पाठवला आहे,

1 जूनपासून Google च्या 'या' सर्व्हिससाठी पैसे मोजावे लागणार
google
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 6:55 PM

कॅलिफोर्निया : तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज गुगल फोटोजवर (Google Photos) सेव्ह करुन ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अ‍ॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील. (Users have to pay 19.99 USD per year for google one subscription)

मेलमध्ये पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसेल.

जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

1 जून 2021 पूर्वीचे फोटोज काऊंट केले जाणार नाहीत

गुगलने म्हटलं आहे की, 1 जून 2021 पूर्वी अपलोड केलेले कोणतेही फोटोज, व्हिडीओज काऊंट केले जाणार नाहीत. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी Google One द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे.

दर वर्षाला 1,467 रुपये मोजावे लागणार

1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमधील कोणत्याही फाईल्स तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये स्टोर करत असाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 15 जीबीची लिमिट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा क्लाऊड स्टोरेजसाठी Google One चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, किंवा फोटोजमध्ये फ्री स्टोरेजसाठी जुना डेटा डिलीट करावा लागेल. गुगल वनचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 19.99 डॉलर्स (1467 रुपये) मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला 100 जीबी डेटा मिळेल.

स्टोरेज क्षमतेची माहिती दिली जाणार

कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, आम्ही हा निर्णय विचार करुन घेतला आहे. हा एक मोठा बदल आहे. परंतु असे बदल करत असताना आम्ही तुम्हालाही यात सामील करुन घेत आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी एक नवं टूल जनरेट करत आहोत. या टूलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील की, तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.

गुगलची नवी पॉलिसी; मेल, फोटो, व्हिडिओ डिलीट होणार

सतत अपडेट असलेल्या गुगलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी (Google Might Delete Your All Content ) आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेले अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाही. त्यांचे जीमेल आणि गुगल ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत.

इतर बातम्या

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

स्वस्तातला 5G फोन हवाय? Xiaomi चे दोन स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

(Users have to pay 19.99 USD per year for google one subscription)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.