5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरावाला Samsung 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

| Updated on: Apr 16, 2022 | 5:34 PM

सॅमसंग गॅलेक्सी एम 32 5जी (Samsung Galaxy M32 5G) स्मार्टफोन भारतीय बाजारात ग्राहकांची चांगली पसंती मिळवत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरीसह MediaTek Dimensity 720 चिपसेट व्यतिरिक्त प्रीमियम फोनसारखं (Premium Smartphone) डिझाईन देण्यात आलं

5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरावाला Samsung 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Samsung Galaxy M32 5G
Image Credit source: Samsung.com
Follow us on

Samsung Phone Discount: सॅमसंग गॅलेक्सी एम 32 5जी (Samsung Galaxy M32 5G) स्मार्टफोन भारतीय बाजारात ग्राहकांची चांगली पसंती मिळवत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरीसह MediaTek Dimensity 720 चिपसेट व्यतिरिक्त प्रीमियम फोनसारखं (Premium Smartphone) डिझाईन देण्यात आलं आहे. हा फोन नॉक्स सिक्योरिटीसह येतो. हा फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन Be Future Ready हॅशटॅगसह सादर केला आहे. चला तर मग या मोबाईल फोनबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

हा स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट्सवर लिस्टेड आहे आणि त्याची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. परंतु आता हा फोन 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच यावर 1000 रुपये अतिरिक्त सूट मिळवण्याची संधी देखील आहे, ज्यासाठी ICICI बँक कार्ड वापरावे लागेल. सॅमसंग शॉप अॅपमुळे या फोनवर 350 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जिथे सॅमसंग ब्लू फेस्ट नावाचा सेल सुरू आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या काही उत्पादनांवर सवलती दिल्या आहेत.

Samsung Galaxy M32 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M32 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरासाठी नॉच स्टाइल कटआउट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येते.

Samsung Galaxy M32 5G चा कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy M32 5G च्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सेलची सेकेंडरी लेन्स देण्यात आली आहे, जी वाइड-अँगल लेन्स आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील देण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार