
एआयमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अनेकांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची भीत असताना दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ते एक शक्तीशाली साधनदेखील ठरतंय. बेंगळुरू इथला अनुभवी इंजीनिअर अमर सौरभ याने एआयच्या मदतीने आपल्या आवडीची नोकरी मिळवण्याचा रंजक मार्ग सांगितला आहे. ‘मेटा’ आणि ‘टिकटॉक’सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या सौरभने ChatGPT च्या कस्टमाइज्ड व्हर्जनचा उपयोग करून फक्त दोन महिन्यांत 7 प्रमुख कंपन्यांकडून इंटरव्ह्यूचा कॉल मिळवलाय. त्यानंतर अखेर PayPal मध्ये आपल्या आवडीच्या पदावर नोकरी मिळवली.
बिझनेस इनसाइडरला आपला अनुभव सांगताना सौरभ म्हणाला, “मेटा आणि टिकटॉकमधील नोकरी सोडल्यानंतर मी एप्रिलमध्ये नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन-तीन महिन्यात मला फक्त दोन ते तीनच इंटरव्ह्यूसाठी कॉल्स आले. त्यानंतर मी माझी रणनिती बदलण्याचा निर्णय घेतला आणि चॅटजीपीटीची मदत घेण्याचा विचार केला. नोकरी शोधण्यासाठी सुरुवातीला चॅटजीपीटीवर खूप सर्वसामान्य उत्तर मिळत होते. त्याचा काही खास फायदा झाला नव्हता. अखेर मी ती समस्या सोडवण्यासाठी चॅटजीपीटीच्या कस्टमाइज्ड व्हर्जनचा वापर करण्यास सुरुवात केली. मी माझा कस्टम जीपीटी तयार केला. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास एक तास लागला.”
कस्टम जीपीटीला आपल्या कामाशी अधिक संबंधि बनवण्यासाठी त्याने खालील डेट त्यात अपलोड केला.
यानंतर सौरभने एआयला स्पष्ट निर्देश दिले की तो प्रोडक्ट मॅनेजमेंटच्या वरिष्ठ पदासाठी नोकरीच्या शोधात आहे. कस्टम जीपीटी तयार केल्यानंतर विविध कंपन्यांकडून त्याला इंटरव्ह्यूसाठी अनेक कॉल्स येऊ लागल्याचं सौरभने पुढे सांगितलं. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्याला रेडिट (Reddit), इनट्यूट (Intuit) आणि पेपाल (PayPal) सारख्या एकूण साक मोठ्या कंपन्यांमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल्स आले. मुलाखतीनंतर सौरभला अखेर PayPal मध्ये मनासारख्या पदावर नोकरी मिळाली.
मी माझ्या कस्टम जीपीच्या कार्यक्षमतेवर खूप खुश आहे, अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला. पुन्हा भविष्यात नवीन नोकरी शोधावी लागली तर याच एआय टूलचा वापर करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. सौरभच्या या उदाहरणावरून एआयचा योग्य वापर केल्यास करिअरला नवीन दिशा मिळू शकते, हे सिद्ध होतंय.