Cheapest 5G Plan : जिओ, एअरटेल की VI? सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन कोणाचा?

Jio vs Airtel vs VI : जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या भारतातील आघाडीच्या टेक कंपन्या आहेत. आज आपण सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन कोणत्या कंपनीचा आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Cheapest 5G Plan : जिओ, एअरटेल की VI? सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन कोणाचा?
Cheapest 5g Plan Jio vs airtel vs vi
Image Credit source: Google
| Updated on: Jun 15, 2026 | 9:41 PM

भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या टेक कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांचे युजर्स 100 कोटींपेक्षा जास्त आहेत. या तिनही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन सादर करत असतात. सध्या 5G नेटवर्कचा काळ आहे. आज आम्ही तु्म्हाला या तिन्ही कंपन्यांपैकी कोणती कंपनी सर्वात स्वस्त 5G प्लॅन देते याबाबत माहिती सांगणार आहोत. तिनही कंपन्यांच्या रिचार्जची माहिती जाणून घेऊयात.

Vi 5G प्लॅन : किंमत 349 रुपये

व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त 5G प्लॅन 349 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा दिली जाते. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो, मात्र त्यावर 300GB FUP (Fair Usage Policy) मर्यादा लागू आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये बिंग ऑल नाईट, व्हि मुव्हीज आणि टीव्ही, डाटा डिलाईट आणि वीकेंड डाटा रोलओव्हर यांचा समावेश आहे.

Jio 5G प्लॅन : किंमत फक्त 198 रुपये

रिलायन्स जिओच्या 5G स्पीडचा अनुभव घ्यायचा असेल, तर कंपनीचा सर्वात स्वस्त 5G प्लॅन 198 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. तसेच JioTV आणि Jio AI Cloud चा लाभही मिळतो. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये कोणतीही FUP मर्यादा नसून खऱ्या अर्थाने अनलिमिटेड 5G डेटा दिला जातो.

Airtel 5G प्लॅन : किंमत 379 रुपये

एअरटेलच्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त 5G प्लॅन 379 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्येही 300GB FUP मर्यादा लागू आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये 6 महिन्यांसाठी मोफत Apple Music सदस्यत्व आणि 1 महिन्यासाठी 30GB गुगल वन क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे.

कोणता प्लॅन सर्वात स्वस्त?

तीन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना केली असता, जिओचा 198 रुपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त 5G प्लॅन ठरतो. कमी किंमतीत जास्त डेटा आणि खऱ्या अर्थाने अनलिमिटेड 5G डेटा मिळत असल्याने हा प्लॅन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय आहे.

Follow Us