AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळवा 40 टक्क्यांपर्यंत सूट, कोणत्या मोबाईल्सवर किती डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ग्राहक फॅब फोन फेस्टचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर युजर्स नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात.

Amazon सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळवा 40 टक्क्यांपर्यंत सूट, कोणत्या मोबाईल्सवर किती डिस्काउंट
smartphones
| Updated on: Jun 28, 2022 | 2:25 PM
Share

अ‍ॅमेझॉनवर (Amazon) नुकताच एक नवीन सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक बंपर ऑफर देण्यात आलेल्या आहेत. सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोनवर डिस्काउंटचा (Discount) लाभ घेऊन हजारोंची बचत करु शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर अ‍ॅमेझॉनच्या या सेलचा तुम्ही नक्कीच चांगला लाभ घेउ शकणार आहात. सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. गेल्या महिन्यांतच अ‍ॅमेझॉनने इलेक्ट्रिक सेल (Electric sale) लाँच केला होता. त्या सेलमध्ये विविध नवीन मोबाईलमध्ये डिस्काउंट देण्यात आले होते. यासह बँक कार्ड, कॅशबॅक, कार्ड डिस्काउंटच्या सुविधा उपलब्ध होत्या. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने अ‍ॅमेझॉनने पुन्हा एक नवीन सेल सुरु केलेला आहे. या सेलमध्येही विविध स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंट मिळण्याची अपेक्षा ग्राहकांकडून वर्तविण्यात येत आहे. या लेखातून सेलबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

तीन दिवसीय सेल

या सेलमध्ये ग्राहक अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फॅब फोन फेस्टचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर युजर्स नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. या सेलमध्ये एसबीआय कार्ड्सवर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. 28 जूनपासून सुरू झालेला Amazon Fab फोन फेस्ट सेल 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये, तुम्ही मिड रेंज आणि बजेट सेगमेंट दोन्ही फोन परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्स अतिशय आकर्षक आहेत.

काय आहेत ऑफर

अ‍ॅमेझॉन सेलद्वारे, तुम्ही नुकताच लाँच  केलेला Tecno POVA 3 हा मोबाईल 10,499 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा आहे. दुसरीकडे, तुम्ही मात्र 10,799 रुपयांमध्ये Redmi Note 11 खरेदी करू शकता. यामध्ये बँक डिस्काउंट आणि इतर ऑफर्सचाही समावेश आहे. डिव्हाइस 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि AMOLED डिसप्लेसह येतो.

Oneplus वर देखील ऑफर

OnePlus Nord CE 2 5G हा स्मार्टफोन या सेलमध्ये 22,499 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 64MP कॅमेरा, AMOLED डिसप्ले आणि 65W फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. तुम्ही स्लिम फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही Xiaomi 11 Lite NE 5G खरेदी करू शकता, हा फोन 20,499 रुपयांना उपलब्ध असेल

Samsung M33

5Gया सेलमध्ये 16,999 रुपयांना Samsung M33 5G खरेदी करू शकता. या सोबतच iQOO Z6 5G हा स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये 12,999 रुपयांना उपलब्ध असेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे. या सेलमधून तुम्ही 10,999 मध्ये Redmi Note 10T 5G खरेदी करू शकता. हा हँडसेट 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट डिसप्ले आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येतो.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.