WhatsApp ला टक्कर द्यायला आले देशी Arattai चॅटींग App, तीन दिवसात 100 टक्के ट्रॅफीक वाढ
WhatsApp या परदेशी मॅसेजिंग App ला टक्कर देण्यासाठी आता इंडियन आवृत्ती Arattai चॅटींग App बाजारात आले असून त्याची तीन दिवसात 100 टक्के ट्रॅफीक वाढ झाली आहे.

आजकाल व्हॉट्सअप चॅटींगमुळे सर्वांना मोबाईलवर कॉल न लावता मॅसेजची देवाण-घेवाण सोपी झाली आहे. मात्र देशात व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी देशी Arattai चॅटींग App अवतरले आहे. याला WhatsApp चे भारतीय व्हर्जन म्हटले जात आहे. या अपचे नाव Arattai आहे.याला चेन्नईच्या Zoho Corporation ने तयार केले आहे. सोशल मीडियावर या नव्या देशी App ची खूपच चर्चा सुरु आहे. याचे युजर देखील वाढत आहेत. या नव्या देशी ऐपचे यश पाहून त्याचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. आम्ही केवळ तीन दिवसात Arattai च्या ट्रॅफीकमध्ये शंभर टक्के वाढ अनुभवली आहे. नवीन साईन अप्स 3000 प्रतिदिन ते 3.5 लाख प्रतिदिन पोहचले आहेत. त्यामुळे आपात्कालिन पद्धतीने इंन्फ्रास्ट्रक्चर जोडत आहोत म्हणजे पुन्हा 100 टक्के वाढ झाली तर ती मॅनेज करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
चेन्नई की Zoho Corporation का देसी मैसेजिंग ऐप Arattai तेजी से लोकप्रिय हो रहा है. फाउंडर श्रीधर वेम्बू के अनुसार, सिर्फ 3 दिनों में इसके ट्रैफिक में 100 गुना उछाल आया और साइन-अप्स 3,000 से बढ़कर 3.5 लाख प्रतिदिन हो गए हैं. WhatsApp जैसे फीचर्स वाले इस ऐप की लोकप्रियता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान की अपील के बाद और बढ़ गई.
Arattai App काय आहे ?
Arattai च्या तामिळ भाषेतील अर्थ कॅज्युअल चॅट म्हणजे नॉर्मली बातचीत. यात युजर्स टेक्स्ट मॅसेज, फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट पाठवू शकतात. तसेच व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल, स्टोरी फिचर आणि चॅनल मॅनेजमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे.
WhatsApp ची जागा घेऊ शकते का ?
Arattai मध्ये अनेक फिचर्स WhatsApp सारखे आहेत, त्यामुळे युजर्स त्याची तुलना WhatsApp बरोबर करत आहे. परंतू याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे याचे मॅसेजसाठी एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन (E2EE) ची आहे. Arattai मध्ये कॉल्स एन्क्रिप्ट आहेत. मात्र सध्या मॅसेज सुरक्षित नाहीत. हा एक मोठा सुरक्षा गॅप आहे. खास करुन त्या ग्राहकांसाठी जे प्रायव्हसीला प्राथमिकता देतात.
काय आहे विशेष
वन-टू-वन आणि ग्रुप चॅट
टेक्स्ट, मीडिया आणि फाईल शेअरिंग
ऑडियो आणि व्हिडियो कॉल्स (एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह )
मल्टी-डिव्हाईस सपोर्ट
डेस्कटॉप ऐप आणि एंड्रॉईड टीव्ही इंटीग्रेशन
स्टोरीज आणि ब्रॉडकास्ट चॅनल
कंपनीने दावा केला आहे की युजर्सचा पर्सनल डेटा मॉनेटाइझ केला जाणार नाही.