AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक

साप म्हटलं की भीतीमुळे भल्या भल्यांची बोबडी वळते, समाजामध्ये सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकदा बिनविषारी साप जरी चावला तरी देखील माणूस प्रचंड घाबरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला चावलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी हे ओळखण्याची एक सोपी ट्रीक आहे.

तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक
snakebite Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 8:01 PM
Share

सापाला सर्वच जण घाबरतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडतात त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर दुसरा कोणताही उपचार त्याच्यावर न करता अशा व्यक्तीला तातडीने डॉक्टरकडे उपचयासाठी नेणे हाच एकमेव उपाय आहे. साप जरी विषारी असला आणि ज्या व्यक्तीला संर्पदंश झाला आहे, अशा व्यक्तीला वेळेत अँटी डोस मिळाला तर अशा रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला साप चावला असेल तर वेळ न घालवता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आहेत, मात्र त्यातील अवघ्या काही जातीच या विषारी आहेत. सापांच्या विषारी प्रजातीमध्ये फुरसे, मण्यार, नाग आणि घोणस या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. याला आपण बिग फोर असं देखील म्हणतो.

जर तुम्हाला कधी सर्पदंश झालाच तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका. अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला बिनविषारी साप चावलेला असतो, मात्र सर्पदंशानंतर तो व्यक्ती इतका घाबरून जातो की सापांच्या विषामुळे नाही तर तो घाबरल्यामुळेच त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे साप कोणताही असू द्या, विषारी, बिनविषारी तुम्ही धीर सोडू नका. तातडीने त्यावर वैद्यकीय उपचार घ्या. साप विषारी जरी असला तरी देखील तुम्हाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले तर तुमचा जीव वाचू शकतो.

आता प्रश्न असा की तुम्हाला चावलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी हे कंस ओळखायचं? त्यासाठी एक सोपी ट्रीक आहे. दुर्गम ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यात आजही या पद्धतीचा वापर चावलेला साप हा विषारी आहे की बनविषारी हे तपासण्यासाठी होतो. असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला विषारी साप चावला असेल तर त्या व्यक्तीच्या जीभेची संवेदना हळूहळू नष्ट होऊ लागते. म्हणजे त्याला कुठल्याही पदार्थांची चव लागत नाही, अशा वेळी ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, अशा व्यक्तीला लिंबाचा पाला किंवा तिखट मिरची खाण्यासाठी दिली जाते. जर त्या व्यक्तीने चवेला प्रतिसाद दिला तर तो साप बिनविषारी होता असं मानलं जातं. मात्र जर त्या व्यक्तीला कुठलीच चव लागत नसेल तर मात्र तो साप विषारी आहे, असं मानलं जातं.

या लेखाचा उद्देश तुम्हाला फक्त माहिती देणं हाच आहे, ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला आम्ही कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर यातील कुठलाही प्रयोग न करता, अशा व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे, हाच त्यावरील उपाय आहे,  वैद्यकीय उपचार मिळाले तर अशा व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

Follow Us
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ