AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone इतका महागडा का ? आयफोनचा सर्वात महागडा पार्ट कोणता ?

आयफोन जवळ असणे हे स्टेटस सिंबल बनलेले आहे. या फोनच्या खरेदीसाठी इतकी झुंबड का उडते. त्याच्या किंमतीचे नेमके रहस्य काय ? iPhone इतका महागडा असण्याचे नेमके कारण काय ?

iPhone इतका महागडा का ? आयफोनचा सर्वात महागडा पार्ट कोणता ?
iphone 17 pro max
| Updated on: Sep 20, 2025 | 7:08 PM
Share

दरवर्षी नव्या iPhone मॉडेल्सच्या लाँचिंगनंतर त्याच्या किंमतीवरही चर्चा होत असते. लोक नेहमीच प्रश्न करतात की आयफोनची किंमत इतकी जास्त का असते ? आयफोन वापरणे हे स्टेटस सिंबल बनले आहे. परंतू आयफोन इतका महाग असण्यामागे त्याची क्वालीट तर असतेच परंतू आयफोनचा रेटही जादा असण्यामागे त्याचे विविध पार्टही महागडे असतात… Apple ची प्रीमियम क्वालिटी, हायटेक पार्ट्स आणि उत्कृष्ट सॉफ्टवेअर ऑप्टीमायझेशन त्यास महाग बनवते. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? आयफोनचा सर्वात महागडा पार्ट कोणता ? चला तर पाहूयात iPhone ची मोठी किंमत आणि त्यामागची कारणं आणि सर्वात महागड्या पार्ट्स बाबत माहिती

iPhone चा सर्वात महागडा पार्ट कोणता ?

आयफोनचा सर्वाधिक महागडा आणि महत्वाचा भाग म्हणजे याचा डिस्प्ले होय. Apple तिच्या iPhone मध्ये OLED वा Super Retina XDR डिस्प्लेचा वापर करते. ज्यास सॅमसंग आणि एलजी सारख्या दिग्गज कंपन्या तयार करतात. हे डिस्प्ले हायटेक असतात. आणि यात HDR सपोर्ट, हाय ब्रायटनेस,उत्तम कलर एक्यूरसी आणि स्मूथ टच रिस्पॉन्स सारख्या अनेक खुबी असतात. मीडिया रिपोर्टनुसार iPhone चा डिस्प्लेच 150 ते 200 डॉलर ( म्हणजे सुमारे 12,500 ते 16,700 रुपये)पर्यंत असू शकतो. त्यामुळे आयफोनचा डिस्प्ले तुटल्यानंतर त्याची दुरुस्ती खूपच खर्चिक असते.

अन्य महागडे पार्ट्स

डिस्प्ले हा iPhone चा महागडा हिस्सा आहेच. याशिवाय अन्य पार्ट्स देखील महागडे आहेत. आपल्या शानदार परफॉरमन्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी Apple ची A-सीरीज बायोनिक चिप ही डिझाईन आणि निर्मितीत महागडी असते. याशिवाय iPhone चा मल्टी-कॅमरा सेटअप, ज्यात एडव्हान्स सेंसर, ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन (OIS) आणि AI-बेस्ड प्रोसेसिंग देखील खूपच खर्चिक असते.

iPhone मध्ये वापरले जाणारे हाय-स्पीड NAND फ्लॅश स्टोरेजची किंमत देखील अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत खूप जास्त असते. आयफोनची प्रीमीयम बॉडी मटेरियल उदा.सर्जिकल-ग्रेड स्टेनलेस स्टील आणि सिरॅमिक शील्ड ग्लास देखील आयफोनची निर्मिती खर्च वाढवते. बॅटरी देखील तिची दीर्घायुष्य आणि वेगाने होणारे चार्जिंगसाठी डिझाईन केलेली असते, यामुळे देखील आयफोनची किंमत वाढते.

सॉफ्टवेअर आणि ब्रँड व्हॅल्यूचे योगदान

आयफोनची महागडी किंमत केवळ हार्डवेअर पर्यंत मर्यादित नाही. Apple चे iOS ऑपरेटिंग सिस्टीम, मजबूत सिक्युरिटी फिचर्स, खूप काळापर्यंत मिळणारे सॉफ्टवेअर अपडेट आणि एप्सचे शानदार ऑप्टिमायझेशन यास प्रीमियम बनवतात. याशिवाय Apple चे रिसर्च आणि डेव्हलपमेंट (R&D)मध्ये मोठी गुंतवणूक आणि ब्रँज व्हॅल्यू देखील iPhone ला अन्य स्मार्टफोन्स पेक्षा वेगळे ठरवतात.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.