iPhone 15 चे दर कोसळले, Amazon Sale मध्ये आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध
iPhone 15 च्या किंमतीत आतापर्यंत सर्वात मोठी घट झाली आहे. Apple हा आयफोन लाँचिंग प्राईसच्या हजारो रुपयांनी स्वस्तात मिळत आहे. येत्या Amazon Sale हा फोन आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत मिळणार आहे.

कीकडे Apple iPhone 17 Series बाजारात लाँच झाली आहे. या नव्या आयफोनला घेण्यासाठी रांगा लागल्या असताना आता iPhone 15 आतापर्यंत सर्वात कमी किंमतीला खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर २३ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या फेस्टीव्हल सेलमध्ये आयफोन लाँच प्राईज पेक्षा स्वस्त झाला आहे. Amazon ने अपकमिंग सेलमध्ये आयफोनवर मिळणारी डील रिव्हील केली आहे. iPhone 15 सीरीज किंमत गेल्यावर्षी पहिल्यांदा कमी झाली होती. 79,900 रुपयांच्या सुरुवातीची किंमत हा फोन लाँच झाला होता. आता तो 45,000 किंमतीत खरेदी करता येणार आहे.
iPhone 15 च्या किंमती मोठी घट
Apple या आयफोन 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती लाँच झाला होता. Apple ने या आयफोनच्या किंमतीत गेल्यावर्षी 10,000 रुपयांची कपात केली होती. यानंतर हा 69,900 रुपयांच्या किंमतीत मिळत मिळू लागला होता. iPhone 17 सीरीज लाँच झाल्यानंतर कंपनीने या फोनला कंपनीने त्यांच्या अधिककृत स्टोअरमधून हटवला आहे.
Amazon वर हा फोन सध्या 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लिस्ट केला आहे. अपकमिंग सेलमध्ये Apple चा हा आयफोन 43,749 रुपयांच्या प्रभावी किंमतीत मिळणार आहे. फोनच्या किंमतीत 17,000 रुपयांहून अधिक कपात केली आहे. तसेच हा फोन लाँच किंमतीच्या 37,000 रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. हा आयफोन 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन, पिंक आणि येलो अशा पाच कलर ऑप्शनमध्ये तो मिळतो.
iPhone 15 चे फिचर्स
साल 2023 मध्ये लाँच झालेल्या iPhone 15 ला 6.1 इंचाचा सुपर रेटीना XDR डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डायनामिक आयलँड फिचरवाला डिस्प्ले दिलेला आहे. फोनच्या पाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP + 12MP कॅमेरे मिळतात. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 12MP कॅमेरा दिलेला आहे. आयफोन 15 6GB रॅम सह A16 Bionic चिप दिलेली आहे. हा फोन iOS 17 ऑपरेटींग सिस्टीमवर चालतो. जिला iOS 18 मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.
