AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय हिंद…आता Appleचं सर्वात महागडं मॉडल iPhone 17 Pro Max भगव्या रंगात, खरेदीसाठी झुंबड

दरवर्षी नव्या आयफोन मॉडेल्सना जबरदस्त मागणी असते, यंदाही आहे. iPhone 17 Pro Max चा कॉस्मिक ऑरेंज कलर ऑप्शन भारतीयांना खूपच पसंद पडला आहे. या भगव्या कलरशी साधर्म्य असलेल्या या कलरच्या व्हेरिएंटला इतकी मागणी आहे की प्री बुकींगलाही तो उपलब्ध नाही.

जय हिंद...आता Appleचं सर्वात महागडं मॉडल iPhone 17 Pro Max भगव्या रंगात, खरेदीसाठी झुंबड
iPhone 17 Pro Max Cosmic Orange
| Updated on: Sep 16, 2025 | 10:23 PM
Share

Apple iPhone 17 Series चे सर्वात महागडे मॉडेल iPhone 17 Pro Max कॉस्मिक ऑरेंज कलरच्या व्हेरिएंटला प्रचंड मागणी पाहायला मिळत आहे. कॉस्मिक ऑरेंज व्हेरिएंट भगव्या रंगाशी मिळते जुळते आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांमध्ये या व्हेरिएंटच्या रंगावरुन इतकी जास्त उत्सुकता आणि क्रेज पाहायला मिळत आहे की प्री बुकींग सुरु झाल्यानंतर तीन दिवसात हा व्हेरिएंट भारत आणि अमेरिकेत आऊट ऑफ स्टॉक झाला आहे.

स्टोअर पिक-अप ऑप्शनसह उपलब्ध नाही

Appel इंडियाच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारतात आयफोन प्रो मॅक्सच्या सर्व व्हेरिएंट्स एप्पल स्टोर्सवर पिक-अप पर्यायासह प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नाही. भारतात iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Pro सीरीज दोन्हीमध्ये कॉस्मिक ऑरेंज डिव्हाईस स्टोअर पिक-अप ऑप्शनसह प्री बुकींगसाठी उपलब्ध नाही.

(फोटो- एपल डॉट कॉम)

इकॉनॉमिक टाईम्सच्या मते एका Apple तज्ज्ञाने सांगितले की मला तुम्हाला हे सांगताना दुख होत आहे की , मोठ्या संख्येने प्री-ऑर्डरमुळे iPhone 17 Pro Max चे सर्व कॉस्मिक ऑरेंज खूप वेगाने विकले जात आहेत. आयफोन 17 प्रो मॅक्सच्या कोणत्याही स्टोरेजमध्ये सध्या हा कलर ऑप्शन उपलब्ध नाही.

तज्ज्ञाने सांगितले की मला असुविधेमुळे खरेच खेद वाटत आहे. परंतू बॅक – एण्ड टी लवकरात लवकर कॉस्मिक ऑरेंज (भगव्या रंगासारखा दिसणारा ) चा पुरवठा पुन्हा सुरु करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. काही स्टोअर्सवर 19 सप्टेंबरपासून लिमिटेड युनिट्स उपलब्ध होतील, ज्यांना प्री बुकींग ऑर्डरसाठी खरेदी केले जाऊ शकते. परंतू हे हॅण्डसेट पहिले या पहिल मिळवा या आधारे दिले जाणार आहेत.

iPhone 17 Pro Max Price in India

आयफोन 17 प्रो मॅक्सचे 256 जीबी वेरिएंट, 512 जीबी,1 टीबी आणि 2 टीबी एकूण चार स्टोरेज व्हेरिएंट्स आहेत. आणि या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1,49,900 रुपये, 1, 69,900 रुपये, 1,89,900 रुपये आणि 2,29,900 रुपये आहे.

12 सप्टेंबरपासून आयफोन 17 सीरीजची प्री बुकींग चालू आहे. आणि 19 सप्टेंबरपासून प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांसाठी फोनची डिलिव्हरी सुरु होणार आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....