WhatsApp: आधार, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे बाळगण्याच्या त्रासातून सुटका; व्हॉट्सॲपवर आता डिजिलॉकरचा पर्याय

| Updated on: Jul 21, 2022 | 3:21 PM

बाइक किंवा कारचे आरसी, इंश्‍योरेंस आणि पीयूसी नसल्याने वाहतूक पोलिस संबंधित चालकाकडून वाहतूक नियमांचा भंग केल्यासंदर्भात दंड आकारु शकतात. अशात, व्हॉटस्‌ॲपवर डिजिलॉकरचा ॲक्सेस करुन पावती फाडण्यापासून युजर्सला वाचता येते.

WhatsApp: आधार, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे बाळगण्याच्या त्रासातून सुटका; व्हॉट्सॲपवर आता डिजिलॉकरचा पर्याय
व्हॉटस्‌ॲपमधील ‘या’ टीप्स फॉलो करा
Image Credit source: Twitter
Follow us on

व्हॉटस्‌ॲपवर (WhatsApp) युजर्स अनेक सेटिंग्स आणि विविध पर्यायांचा वापर करीत असतात. व्हॉट्सॲपचा वापर लक्षात घेता विविध शासकीय सेवांचे ॲक्सेसदेखील व्हॉटस्‌ॲपला देण्यात आला आहे. या शिवाय युजर्स वाहतूक नियमांचा भंग होण्यापासून वाचण्यासाठीही व्हॉटस्‌ॲपचा वापर करु शकतात. बाइक किंवा कारचे आरसी, इंश्‍योरेंस आणि पीयूसी नसल्याने वाहतूक पोलिस संबंधित चालकाकडून वाहतूक नियमांचा भंग केल्यासंदर्भात दंड आकारु शकतात. अशात, व्हॉटस्‌ॲपवर डिजिलॉकरचा (Digilocker) ॲक्सेस करुन पावती फाडण्यापासून युजर्सला वाचता येते. अनेक दुचाकी किंवा कारचालक आरसी, इंशोरेंस किंवा पीयूसी आदी कागदपत्रे (Documents) घरी विसरुन जात असतात. अशा लोकांसाठी डिजिलॉकर हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

असा मिळवा ॲक्सेस

व्हॉटस्‌ॲप युजर्स +91 9013151515 या नंबरला सेव्ह करुन किंवा त्यावर नमस्कार किंवा इंग्रजीत हाय टाइप करुन त्यानंतर चॅटबॉक्सकडून एक मॅसेज येईल. यात कोविन सर्व्हिस आणि डिजिलॉकर सर्व्हिसचा ॲक्सेस मिळू शकेल. यानंतर रिप्लाय करुन कोणत्याही एक सर्व्हिसची निवड करु शकतात. डिजिलॉकर सर्व्हिसेसचा पर्याय निवडून लायसेंस आणि व्हीकल रजिस्ट्रेशनसारखे कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. सोबत पॅनकार्ड सारखे कागदपत्रेही डाउनलोक करु शकणार आहोत. याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना आरसी आणि लाइसेंस दाखवले जाउ शकते.

हे कागदपत्र केले जातील डाउनलोड

पॅन कार्ड

हे सुद्धा वाचा

ड्रायव्हिंग लायसेंस

सीबीएसई दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आससी)

विमा पोलिसी

दहावी वर्गातील गुणपत्रक

बारावी वर्गातील गुणपत्रक

विमा पॉलिसी कागदपत्रे

2020 मध्ये आला होता कोविन पर्याय

व्हॉट्‌सॲपवर 2020 मध्ये मायगव्ह हेल्पडेस्कने कोविडशी संबंधित माहितीसह व्हॅक्सिन टाइम टेबल सेट करणे आणि व्हॅक्सिन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिला होता. आता या प्लॅटफार्मवर विविध पध्दतीचे कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा मिळत आहे.