
आजकाल, स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांकडे मोबाईल फोन आहेत. आज पूर्वीपेक्षा बाजार अनेक नवीन आणि महागडे फोन आहेत. मोबाईल कोणताही असो… प्रत्येक मोबाईलमधील महत्त्वाची गोष्ट म्हणचे चार्जिंग… मोबाईल चार्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमचा मोबाईल देखील खराब होणार नाही आणि मोबाईलमध्ये असलेली बॅटरी देखील जास्त काळ टिकेल… तर जाणून घ्या अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. ज्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
अनेक लोकांची एक सामान्य सवय म्हणजे ते त्यांचे फोन नेहमीच फूल चार्ज म्हणजे 100 टक्के चार्ज करतात. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सवय दीर्घकाळात तुमच्या बॅटरीला हानी पोहोचवू शकते. चला जाणून घेऊया का?
स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये मर्यादित चार्ज सायकल असतात. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल 100 टक्के चार्ज करता आणि ही प्रक्रिया वारंवार पुनरावृत्ती करता तेव्हा बॅटरीची क्षमता लवकर कमी होते. त्यामुळे मोबाईल 100 टक्के चार्ज करणं टाळा. परिणामी, बॅटरी पूर्वीसारखी चार्ज ठेवू शकत नाही आणि लवकर संपू लागते.
मोबाईलची बॅटरी लवकर खराब होते: मोबाईल 100 टक्के चार्ज झाल्यावर बॅटरीवर उच्च व्होल्टेजचा ताण येतो, ज्यामुळे हळूहळू तिची रासायनिक रचना खराब होते. म्हणूनच, तज्ज्ञ चार्ज 80 – 90 टक्के ठेवण्याची शिफारस करतात, ज्यामुळे बॅटरीवर कमी ताण येतो.
बॅटरी जास्त गरम होण्याचा धोका: फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर, चार्जर आणि बॅटरीमधील संतुलन राखण्यासाठी अतिरिक्त उर्जेचे व्यवस्थापन करावे लागते. यामुळे फोन गरम होऊ शकतो आणि जलद गरम झाल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.
तुमचा फोन अशा प्रकारे चार्ज करा: फोन 20 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान चार्ज ठेवा. मोबाईल रात्रभर चार्जिंग टाळा. जलद चार्जिंगचा वारंवार वापर टाळा, कारण त्यामुळे उष्णता वाढते. फक्त मूळ किंवा ब्रँडेड चार्जर वापरा.