
आजकाल फोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण जर तो चुकून पाण्यात पडला, तर मोठी अडचण होऊ शकते. पाण्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते, फोन बंद पडू शकतो किंवा कायमचं नादुरुस्त होऊ शकतो. अशा वेळी घाबरून न जाता तातडीने योग्य पावलं उचलली, तर तुमचा फोन वाचू शकतो.
बरेच लोक पाण्यात पडलेला फोन तांदळात ठेवतात, पण हा उपाय खरंच फायदेशीर आहे का? आणि फोन पाण्यात गेला, तर नेमकं काय करायचं? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.
तांदूळ हवेतील ओलावा शोषतो, हे खरं असलं तरी पाण्यात पडलेला फोन वाचवण्यासाठी हा उपाय पुरेसा नाही. उलट, तांदळाचे लहान कण फोनच्या चार्जिंग पोर्ट, स्पीकर किंवा जॅकमध्ये अडकून समस्या वाढवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हा उपाय काहीसा जुना आणि आता कमी प्रभावी मानला जातो.
१. लगेच फोन बंद करा : फोन पाण्यातून बाहेर काढताच तो चालू असेल, तर लगेच बंद करा. चालू फोनमुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
२. सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसा : फोनच्या बाहेर आणि पोर्ट्सजवळील पाणी हलक्या हाताने सुक्या कपड्याने पुसा.
३. कव्हर, सिम, मेमरी कार्ड काढा : पाण्याचा अडथळा होणारी सर्व उपकरणं काढून टाका.
४. नैसर्गिकरित्या वाळू द्या किंवा ड्रायरचा वापर करा : फोन कोरड्या व हवेशीर जागेत ठेवा, किंवा गरज भासल्यास हलक्याश्या हवेच्या ड्रायरने सुखवा.
भारतात अंदाजे 70 कोटींहून अधिक फोन वापरकर्ते आहेत, आणि त्यापैकी बरेच जण फोन पाण्यात पडण्याच्या समस्येला सामोरं जातात. विशेषतः पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी फिरताना अशा घटना वारंवार घडतात. पण बऱ्याचदा चुकीच्या उपायांमुळे फोनचं नुकसान टाळण्याऐवजी ते वाढतं. उदाहरणार्थ, तांदूळ हा उपाय वर्षानुवर्षे वापरला जातो, पण आधुनिक फोन्सच्या जटिल रचनेमुळे तो प्रभावी ठरत नाही.