AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लू टिक बंद करायचंय? मग WhatsApp च्या या ‘सीक्रेट’ सेटिंग्स एकदा नक्की वाचा!

WhatsApp blue tick, how to turn off blue tick, WhatsApp privacy, WhatsApp settings, read receipts, last seen, online status,व्हॉट्सॲप ब्लू टिक, ब्लू टिक कसे बंद करावे, व्हॉट्सॲप प्रायव्हसी, व्हॉट्सॲप सेटिंग्स, रीड रिसिप्ट्स, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस,

ब्लू टिक बंद करायचंय? मग WhatsApp च्या या ‘सीक्रेट’ सेटिंग्स एकदा नक्की वाचा!
Follow us
| Updated on: Apr 14, 2025 | 5:43 PM

WhatsApp हे सध्या जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर केवळ वैयक्तिक संवादासाठीच नाही, तर व्यावसायिक कामकाजासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, हे अ‍ॅप वापरताना अनेकांना त्यांच्या गोपनीयतेची चिंता वाटते. काही युजर्सना वाटते की, इतरांना हे कळू नये की आपण मेसेज वाचला आहे की नाही किंवा आपण सध्या ऑनलाइन आहोत की नाही. यासाठी WhatsApp मध्ये काही खास सेटिंग्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आपण आपल्या प्रायव्हसीवर नियंत्रण ठेवू शकतो.

ब्लू टिक हे त्या सेटिंग्सपैकी एक महत्त्वाचे फिचर आहे. जेव्हा एखादा युजर मेसेज वाचतो, तेव्हा तो मेसेज समोरच्याला दोन निळ्या टिकच्या स्वरूपात दिसतो. ही टिक ‘Read Receipts’ मुळे दिसते. जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरच्या व्यक्तीला हे कळू नये की तुम्ही मेसेज वाचला आहे, तर तुम्ही ही सुविधा बंद करू शकता. हे करण्यासाठी WhatsApp उघडा, वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा, ‘Settings’ मध्ये जा, त्यानंतर ‘Privacy’ हा पर्याय निवडा. येथे ‘Read Receipts’ नावाचा पर्याय दिसेल, तो बंद (Off) केल्यास ब्लू टिक दिसेनासे होतील.

निवडक लोकांनाच तुमचा लास्ट सीन दिसावा

ब्लू टिकप्रमाणेच ‘Last Seen & Online’ हे फिचरही तुमची गोपनीयता ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. हे फिचर वापरून तुम्ही ठरवू शकता की कोणाला तुमचा शेवटचा ऑनलाइन वेळ दिसावा. यासाठी ‘Privacy’ मध्ये जाऊन ‘Last Seen & Online’ या पर्यायावर क्लिक करा. येथे ‘Everyone’, ‘My Contacts’, ‘My Contacts Except…’ आणि ‘Nobody’ असे चार पर्याय दिलेले आहेत. तुम्ही कोणालाही किंवा काही निवडक लोकांनाच तुमचा लास्ट सीन दिसावा अशी निवड करू शकता.

हे सुद्धा वाचा

 पण उत्तर लगेच द्यायचं नसेल

याशिवाय, तुम्हाला सध्या तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे देखील लपवायचे असल्यास त्याच सेटिंगमध्ये ‘Who can see when I’m online’ हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही हा पर्याय ‘Same as Last Seen’ असे सेट केल्यास, ज्या लोकांना लास्ट सीन दिसत नाही, त्यांनाही तुमचं ऑनलाइन स्टेटस दिसणार नाही. ही सेटिंग खास करून जेव्हा तुम्हाला एखाद्याचे मेसेज वाचायचे असतील पण उत्तर लगेच द्यायचं नसेल, अशावेळी उपयोगी पडते

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.