
Reliance Jio ने 50 कोटीहून अधिक ग्राहकांचा आकडा पार केला आहे. कंपनीच्या जवळ तिच्या ग्राहकांना खूप सारे प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान आहेत. आता रिलायन्स जिओने आपल्या 5G SA ( स्टँडअलोन ) नेटवर्कपर्यंत संपर्कासह Unlimited 5G डेटाचा प्लान केवळ 601 रुपयांत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
या वाऊचरची घोषणा 1.5GB डेली डेटा प्लानवर ग्राहकांसाठी एक ऑफर म्हणून केलेली आहे. कंपनी 601 रुपयांच्या प्लान सोबत ग्राहकांना अनेक 5G अपग्रेड वाऊचर देणार आहे. ग्राहकांना 51 रुपयांचे 12 अपग्रेड वाऊचर मिळतील. ग्राहक या वाऊचरचा वापर करुन त्यांच्या मोबाईलला वर्षभर 5G नेटवर्कशी कनेक्ट ठेवू शकणार आहे. तुम्ही तुमच्या जिवलंगाना यास गिफ्ट म्हणून देऊ शकता. चला तर काय आहे नेमकी योजना ते पाहूयात….
टेलीकॉटॉकने आपल्या बातमीत म्हटले आहे की 601 रुपयांच्या प्लानचा लाभ केवळ तेच ग्राहक उठवू शकतात जे सध्या जिओचा 1.5GB डेली डेटा प्लानचा वापर करत आहेत. 1GB डेली डेटा प्लान वापरणारा कोणताही युजर याचा वापर करु शकणार नाही.याशिवाय युजर जिओकडून वेगळा 51 रुपयांचा प्लान देखील खरेदी करु शकतो.
या शिवाय जिओने सांगितले की युजर हे गिफ्ट वाऊचर त्यांच्या मित्रांना किंवा नातलगांसाठी देखील खरेदी करु शकतात. हे वाऊचर MyJio ऐपद्वारे दुसऱ्या युजरला ट्रान्सफर देखील करु शकतात. हा ऐप iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे 51 रुपयांचे वेग-वेगळे वाऊचर दुसऱ्या युजर्सला ट्रान्सफर करता येणार नाहीत. मात्र, 601 रुपयांचा संपूर्ण प्लान ट्रान्सफर करता येणार आहे. या वाऊचरना रिडीम करण्यासाठी युजर्सना MyJio ऐपमध्ये जाऊन My Voucher सेक्शनमध्ये जाऊन यांना रिडीम करावे लागणार आहे.
5G अपग्रेड वाऊचर हे निश्चित करतात की जर ग्राहकाने 1.5GB डेली डेटा प्लानने रिचार्ज केला आहे तर त्यांच्याजवळ 5G नेटवर्कपर्यंत पोहचण्याचा मार्ग उपलब्ध आहे. हा जिओला आपल्या 5G नेटवर्कला मोनेटाईज करण्याचा आणि ARPU ( एव्हरेट रेव्हेन्यू प्रति यूजर्स ) मध्ये सुधार करण्यासही मदत करतो आणि ग्राहकाला हायस्पीड 5G नेटवर्क जुळण्यातही मदत करतो. टेलीकॉम कंपनीद्वारे 101 रुपये आणि 151 रुपये किंमतीचे आणखीही 5G अपग्रेड वाऊचर सादर केले जात आहेत.