OTT मनोरंजनाची मेजवानी आता मोबाईल प्लॅन्समध्ये! कोणता टेलिकॉम प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम?

Netflixसारख्या प्रीमियम प्लॅटफॉर्म्सला आता मोबाइल प्लॅन्समध्ये समाविष्ट करून टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना ‘डेटा + मनोरंजन’चा झकास पॅकेज देत आहेत. मात्र, 5G उपलब्धता, Netflixचा टाईप आणि प्लॅनची अटी नीट समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.

OTT मनोरंजनाची मेजवानी आता मोबाईल प्लॅन्समध्ये! कोणता टेलिकॉम प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम?
OTT
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 2:03 PM

सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा रंगली आहे. केवळ कॉलिंग आणि डेटा पुरवण्यापलीकडे जाऊन, आता ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्म्सचा मोफत आनंद देऊन आकर्षित केलं जात आहे. विशेषतः Netflixसारख्या प्रीमियम स्ट्रीमिंग सेवांचं मोफत सब्सक्रिप्शन हे आता अनेक टॉप प्रीपेड प्लॅन्सचं मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या तिन्ही कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी Netflixसह खास प्लॅन्स बाजारात आणले आहेत.

जिओचा स्मार्ट प्लॅन

रिलायन्स जिओने ₹1,299 च्या किमतीत असा प्लॅन आणला आहे, जो ‘स्वस्त, मस्त आणि जबरदस्त’ म्हणता येईल. यात 84 दिवसांची वैधता, रोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि 100 SMS रोज असं ठसठशीत पॅकेज आहे. सगळ्यात मोठा आकर्शण म्हणजे Netflix मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत मिळतं. त्याचबरोबर JioTV आणि JioCinemaचा फुल ऑन अ‍ॅक्सेसही मिळतो. आणि जर तुमच्या भागात 5G नेटवर्क असेल, तर मग विचारूच नका – अमर्यादित 5G डेटा म्हणजे icing on the cake!

एअरटेलचा प्रिमियम प्लॅन

₹1,798 चा Airtel चा प्लॅन जरा महाग वाटू शकतो, पण दिलेल्या फायद्यांमुळे तो किमतीचा पुरेपूर मोबदला देतो. रोज 3GB डेटा आणि Netflix बेसिक सब्सक्रिप्शन – म्हणजेच तुम्ही तुमचा आवडता शो मोबाइलवरच नाही, तर टीव्ही आणि लॅपटॉपवरसुद्धा पाहू शकता. याशिवाय Airtel Xstream, हेल्थ सेवांसाठी Apollo 24/7, मोफत HelloTunes – सगळं मिळून हे ‘पैसे वसूल’ पॅकेज आहे. खास करून ज्यांना घरात मोठ्या स्क्रीनवर कंटेंट बघायची सवय आहे, त्यांच्यासाठी हे ‘मस्तच मस्त’ आहे.

Vi चा अफॉर्डेबल प्लॅन

Vodafone Idea म्हणजे Vi चा ₹1,599 चा प्लॅन थोडक्यात ‘बजेटमध्ये धमाका’. 84 दिवसांसाठी रोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि Netflix मोबाईल सब्सक्रिप्शन याचं कॉम्बिनेशन झकास आहे. Vi Movies & TV अ‍ॅप फ्री आणि आठवड्याचं डेटा रोलओवर – म्हणजे एखाद्या आठवड्यात डेटा कमी वापरलात, तर पुढच्या आठवड्यात वाया न जाता उरलेला डेटा वापरता येईल. ‘थोडक्यात – शिल्लकचं सोनं!’

तर, कोणता प्लॅन घ्याल ?

OTT मजा हवी पण बजेटही सांभाळायचंय? मग Vi चा प्लॅन एकदम साजेसा.

घरात TV वर Netflix पाहायचं, जरा जास्त डेटा लागतो? Airtel चा प्रीमियम पॅक तुमच्यासाठीच आहे.

आणि जर डेटा, OTT, कॉलिंग – सगळ्याचं संतुलन पाहायचं असेल, तर Jio चा प्लॅन खिशाला भार न आणता भरपूर देता.