iQOO Z9 5G चा पॉवरफुल स्मार्टफोन! बाजारात अनेक खेळाडूंची हवा टाईट

| Updated on: Mar 12, 2024 | 3:47 PM

iQOO Z9 5G | आयकूचा नवीन स्मार्टफोन iQOO Z9 5G, भारतीय बाजारात दाखल झाला आहे. अगदी स्वस्तातील या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 2 वर्षांकरीता अँड्राईड अपडेट आणि तीन वर्षांकरीता सुरक्षा अपडेट मिळते. या दमदार खेळाडूमुळे बाजारात अनेक कंपन्यांना घाम फुटला आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स..

iQOO Z9 5G चा पॉवरफुल स्मार्टफोन! बाजारात अनेक खेळाडूंची हवा टाईट
Follow us on

नवी दिल्ली | 12 March 2024 : आयकूचा नवीन स्मार्टफोनने iQOO Z9 5G, भारतीय बाजारात एंट्री केली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ड्युअल स्टेरिओ स्पीकर्स, 8 जीबी व्हर्च्युअल रॅम मदत, 2 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट आणि 3 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स सारख्या सुविधा मिळतात. विशेष म्हणजे या फीचर्ससह इतर स्मार्टफोनपेक्षा याची किंमत पण कमी आहे. बाजारात हा स्मार्टफोन दाखल होताच अनेक नवीन खेळाडूंची हवा टाईट झाली आहे. काय आहे या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत…

iQOO Z9 5G ची वैशिष्ट्ये

  1. डिस्प्ले : या आयक्यू स्मार्टफोनमध्ये 1800 निट्स पीक ब्राइटनेस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6.6 इंच फुल-एचडी प्लस रिझॉल्यूशन, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट देतो.
  2. चिपसेट : स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय गेमिंगसाठी 1200 हर्ट्ज टच सॅपलिंग रेटचा फायदा देण्यात आला आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. बॅटरी क्षमता : या 5जी स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 44 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट करतो.
  5. रॅम सपोर्ट : या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. युझर्स 8 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 16 जीबीपर्यंत वाढवू शकतात.
  6. सॉफ्टवेअर : हा लेटेस्ट स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारीत फनटच ओएस 14 वर काम करतो.
  7. कॅमरा सेटअप : या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा Sony IMX882 सेंसरसह मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमरा सेंसर देण्यात आला आहे.

iQOO Z9 5G Price in India

आयकूने नवीन मिड-रेंज स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करुन दिला आहे. ब्रश्ड ग्रीन आणि ग्रेफाईन ब्लू. या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज ऑफर दिली आहे. त्या मॉडेलची किंमत 19 हजार 999 रुपयांपर्यंत आहे. तर 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. Amazon Prime युझर्ससाठी हा स्मार्टफोन 13 मार्च 2024 रोजीपासून सुरु होत आहे. तर इतर ग्राहकांना दुसऱ्या दिवशी 14 मार्च 2024 रोजीपासून हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.