आनंदाची बातमी! आता ATM मधून निघणार PF चे पैसे, 1 मे पासून बदलणार नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 1 मे 2026 पासून 'EPFO 3.0' अंतर्गत नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या PF खात्यातून यूपीआय (UPI) किंवा एटीएमद्वारे पैसे काढता येतील.

PF खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नव्या नियमांनुसार, आता ATM मधून 50 टक्के मर्यादेपर्यंत PF ची रक्कम काढता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी UPI चा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी आपल्या एकूण जमा पुंजीपैकी केवळ अर्धीच रक्कम या पद्धतीने काढू शकतील. उर्वरित रकमेसाठी जुन्या नियमांचे पालन करावे लागेल. या बदलामुळे PF विड्रॉलची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.
पगारदार वर्गासाठी PF हा एक मोठा आधार
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF पगारदार वर्गासाठी एक मोठा आधार आहे. संकटात PF चे पैसे तुमच्यासाठी उपयोगी पडतात. सध्या ऑनलाइन मोडमधून PF चे पैसे काढण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात, ऑफलाइन मोडवर पैशासाठी एक महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ग्राहकांना आता थेट UPI पेमेंट अॅपमधून पैसे काढण्याची सुविधा सरकार देणार आहे. या अंतर्गत EPFO चे नवीन मोबाइल अॅप EPFO 3.0 आणले जात आहे.
EPFO 3.0 म्हणजे काय?
EPFO 3.0 हा एक नवीन तंत्रज्ञानावर आधारित मंच आहे, ज्याचा उद्देश PF संबंधित सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक बनवणे हा आहे. यात ऑटो-सेटलमेंट, डिजिटल अपडेट्स आणि इन्स्टंट ट्रान्झॅक्शन यासारखे फीचर्स असतील. पूर्वी जिथे PF काढण्यासाठी 7 ते 20 दिवस लागत होते, तिथे आता ही प्रक्रिया काही तास किंवा मिनिटांत पूर्ण होऊ शकते.
नवीन नियम कधी लागू होणार?
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, 1 मे 2026 पासून UPI मधून PF चे पैसे काढले जाऊ शकतात. परंतु, प्रत्यक्षात EPFO ने अद्याप असा कोणताही सार्वत्रिक अधिकृत आदेश जारी केलेला नाही. तसे पाहिले तर EPFO बऱ्याच काळापासून या सुविधेसाठी काम करत आहे. 1 मे पासून पण मे महिन्यापासून हा नवा नियम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी EPFO च्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागेल.
PF मध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याचे योगदान किती आहे?
कोणत्याही सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्याचे PF खाते असते. ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या किमान 12 टक्के रक्कम जमा केली जाते. तेवढीच रक्कम कंपनीकडून जमा केली जाते. हे खाते EPFO ओद्वारे व्यवस्थापित केले जाते. जेव्हा एखादा कर्मचारी EPF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो, तेव्हा तो EPS म्हणजेच कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य देखील बनतो.EPF मध्ये नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33% रक्कम EPS मध्ये जमा केली जाते. जर तुम्हाला पेन्शन सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर EPS मध्ये किमान 10 वर्षांचे योगदान आवश्यक आहे.
कोणत्या परिस्थितीत पैसे काढता येतात?
आपत्कालीन उपचार घ्यायचे असल्यास आपण काही पैसे काढू शकता. मुलांच्या शिक्षणासाठी PF फंडातून पैसे काढता येतील. जर तुम्ही किंवा तुमची भावंडे किंवा मुलगा आणि मुलीचे लग्न झाले असेल तर PF फंडातून पैसे काढता येऊ शकतात. घर खरेदी करण्यासाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी तुम्ही निधीतून पैसे काढू शकता.
UPI पेमेंट अॅपमधून PFचे पैसे कसे काढायचे?
UPI मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमचे PF खाते UPI शी लिंक करावे लागेल. यानंतर, EPF सदस्य जीपे, फोनपे आणि पेटीएम सारख्या UPI प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांच्या PF खात्यातून त्वरित पैसे काढू शकतील.
ATM मधून PF चे पैसे कसे काढू शकतो?
नव्या प्रक्रियेत, EPFO आपल्या ग्राहकांना एक विशेष ATM कार्ड जारी करेल. हे कार्ड PF खात्याशी लिंक केले जाईल. या कार्डचा वापर करून ग्राहक थेट ATM मशीनमधून PFचे पैसे काढू शकतील. PF चे पैसे काढण्यासाठी तुम्हाला EPFO मंजूर केलेल्या ATM मध्ये जावे लागेल. मंजूर ATM ची यादी लवकरच जाहीर केली जाईल. ATM मध्ये तुम्हाला तुमच्या EPFO युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) लिंक केलेले कार्ड वापरावे लागेल. ATM मशीनवर तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागेल आणि पैसे काढण्याचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, आपल्याला किती रक्कम काढायची आहे ती निवडावी लागेल. प्रक्रिया करताच तुम्ही तुमच्या गरजेनुसार एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकाल.