फेसबुकवर मित्रांच्या विभागणीसाठी नवे फिचर, ‘हे’ फायदा होणार

| Updated on: Jul 28, 2019 | 11:55 PM

मुंबई: प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच वेगवेगळी फिचर्स आणली आहेत. मात्र, अनेक युजर्सने अजूनही ही सर्व फिचर्स पूर्ण वापरलेली नाहीत. त्यापैकीच एक फिचर म्हणजे फ्रेंड्स लिस्ट फिचर. यात आपल्याला आपल्या फेसबुकवरील मित्रांची वेगवेगळी विभागणी करता येते. जसे की शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कुटुंब, जवळचे मित्र आणि इतरही अनेक. या वेगवेगळ्या याद्यांचा फायदा काय? […]

फेसबुकवर मित्रांच्या विभागणीसाठी नवे फिचर, हे फायदा होणार
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच वेगवेगळी फिचर्स आणली आहेत. मात्र, अनेक युजर्सने अजूनही ही सर्व फिचर्स पूर्ण वापरलेली नाहीत. त्यापैकीच एक फिचर म्हणजे फ्रेंड्स लिस्ट फिचर. यात आपल्याला आपल्या फेसबुकवरील मित्रांची वेगवेगळी विभागणी करता येते. जसे की शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कुटुंब, जवळचे मित्र आणि इतरही अनेक.

या वेगवेगळ्या याद्यांचा फायदा काय?

फेसबुकने वेगवेगळ्या यादी करण्याचे फिचर दिले आहे. मात्र, त्याचा नेमका उपयोग अनेकांना माहिती नाही. अनेकदा आपल्याला काही फोटो सर्वांसोबत शेअर करायचे नसतात. कधीकधी ठराविक मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबतच फोटो शेअर करायचे असतात. काही फोटो तर कुटुंबीयांपासून लपवावे लागतात. काही फोटो मित्रांपासूनही लपवले जातात. यासाठीच फेसबुकचे हे नवे फिचर मदत करते. विशेष म्हणजे आधी आपल्याला पोस्ट शेअर करताना पब्लिक, फ्रेंड्स किंवा ओन्ली मीचा पर्याय असायचा. यापुढे या नव्या फिचरमुळे आपल्याला आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे अचूक लोकांशी शेअर करता येतील.

या नव्या फिचरमुळे तुम्हाला आता कोणताही फोटो शेअर करण्यात अडथळा येणार नाही. ना कुटुंबाची भिती असेल, ना इतर कुणाची. यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.

मित्रांची यादी कशी करणार?

  • सर्वप्रथम फेसबुक साईटवर जाऊन लॉग-इन करा. जर एखाद्या पीसी किंवा लॅपटॉपचा उपयोग असेल तर अधिक सोयीस्कर.
  • फेसबुक होमपेजवर डावीकडे मेन्यूमध्ये जाऊन ‘Friend Lists’ मेन्यूवर क्लिक करा.
  • त्यात अधिक माहितीसाठी see more येथेही क्लिक करा. त्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल.
  • त्यानंतर उजव्या बाजूला ‘+create list’ वर क्लिक करा.