वडील अभ्यास करु देत नाहीत, टीव्ही पाहतात, सहावीतील मुलाची पोलिसात तक्रार

जामनेरमधील एका मुलाने ‘माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, इतकंच नाही तर आईलाही मारतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी तक्रार थेट पोलीस स्टेशनमध्ये केली.

वडील अभ्यास करु देत नाहीत, टीव्ही पाहतात, सहावीतील मुलाची पोलिसात तक्रार

जळगाव : मुलं अभ्यास करत नाहीत अशी पालकांची ओरड असते. मात्र जामनेरमधील एका मुलाने ‘माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, इतकंच नाही तर आईलाही मारतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी तक्रार थेट पोलीस स्टेशनमध्ये केली.

वडिलांची तक्रार घेऊन आलेल्याची मुलची पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी समजूत काढली. तसेच त्याला नवीन कपडे घेऊन दिले. त्यानंतर त्यांनी पालकांना बोलावून त्यांनाही समजावून सांगितलं.

जामनेर येथील भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलाने ही तक्रार दिली होती. या मुलाची आई शेतात मजुरी करते आणि वडील गवंडी काम करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात.

बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊस सुरू असताना हा मुलगा हाफ पॅण्ट आणि बनियनवरच पोलीस ठाण्यात आला. त्याने माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, आईलाही मारतात त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी निलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याला दुकानात नेले, कपडे घेऊन दिले. मुलगा म्हणाला, मला सॅण्डलसुद्धा पाहिजे. मग त्याला सॅण्डलही घेऊन दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलावून घेवून त्यांना समज दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI