Micromax In सिरीज लाँच होण्याच्या मार्गावर, पाहा फर्स्ट लुक

भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स 3 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नव्या In-सिरीज या स्मार्टफोन्सद्वारे मार्केटमध्ये कमबॅक करणार आहे.

Micromax In सिरीज लाँच होण्याच्या मार्गावर, पाहा फर्स्ट लुक
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 6:56 AM

मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) 3 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नव्या In-सिरीज या स्मार्टफोन्सद्वारे मार्केटमध्ये कमबॅक करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी सातत्याने या फोनबद्दल थोडी-थोडी माहिती शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या इन-सिरीजमधील फिचर्सची माहिती समोर आली होती. आता या फोनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. (First look of Micromax In series smartphones has been revealed)

Micromax चे सह-संस्थापक राहुल शर्मा (Rahul Sharma) यांनी टेक्निकल गुरुजी या युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत In-सिरीजमधील स्मार्टफोनचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. राहुल यांनी यावेळी दोन स्मार्टफोन दाखवले. त्यातील एकाचा रंग पांढरा तर दुसरा स्मार्टफोन हिरव्या रंगाचा आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे टीजर मायक्रोमॅक्स सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या अशा अफवा आहेत की, 3 नोव्हेंबर रोजी मायक्रोमॅक्स त्यांची In-सिरीज (Micromax In 1 आणि Micromax In 1A) लाँच करणार आहे. दरम्यान मुलाखतीदरम्यान राहुल शर्मा यांनी दोन्ही फोनच्या लाँचिंगची तारीख सांगितलेली नाही.

मेड इन इंडिया स्मार्टफोन

काही दिवसांपूर्वी राहुल शर्मा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की, मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असेल. या इन-सिरीजचे सर्व स्मार्टफोन मेड इन इंडिया असतील.

मायक्रोमॅक्सच्या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स

मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा (Micromax In 1 आणि Micromax In 1A) समावेश असेल. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.

मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असेल.

दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

संबंधित बातम्या

चार रियर कॅमेरे आणि 5000 mAh च्या पॉवरफुल्ल बॅटरीसह HTC Desire 20+ लाँच, किंमत फक्त…

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.