वनप्लस 15 लाँच भारतात लाँच होताच या प्लॅटफॉर्मवर सर्वात आधी होईल विक्री सुरू, जाणून घ्या

चीनमध्ये वनप्लस 15 लाँच झाल्यानंतर लवकरच भारतात लाँच होईल. चिनी व्हेरिएंटच्या अनेक फिचर्सची पुष्टी झाली असली तरी, भारतीय व्हेरियंटचे प्रोसेसर तपशील आणि अधिकृत लाँचनंतर हँडसेट कुठे विकला जाईल चला आजच्या लेखात या बद्दल जाणून घेऊयात.

वनप्लस 15 लाँच भारतात लाँच होताच या प्लॅटफॉर्मवर सर्वात आधी होईल विक्री सुरू, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Oct 29, 2025 | 11:41 PM

वनप्लस 15 लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीने लाँचची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु 29 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुढील आठवड्यात 27 ऑक्टोबरला चिनी बाजारात लाँच होणार आहे. यात चिनी व्हेरिएंट असलेल्या या फोनच्या फिचर्सची पुष्टी झाली असली तरी, भारतीय व्हेरिएंट असलेला वनप्लसचा हा फोन अधिकृतरित्या लाँच झाल्यानंतर कोणत्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकला जाईल हे मात्र उघड झाले आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणत्या प्लॅटफॉर्मवर हा फोन विकत घेता येणार आहे.

भारतात OnePlus 15 लाँच होण्याची तारीख

कंपनीने OnePlus 15 हा फोन अधिकृतरित्या कधी लाँच होईल यांची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवर 29 ऑक्टोबर रोजी काहीतरी खास असे लिहिले आहे, जे स्मार्टफोन प्रेमींना सूचित करते की कंपनी 29 ऑक्टोबर रोजी काहीतरी खास योजना आखत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर तसेच ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर फोनसाठी एक स्वतंत्र मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की लाँच झाल्यानंतर, फोन कंपनीच्या वेबसाइटव्यतिरिक्त अमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे.

वनप्लस 15 स्पेसिफिकेशन्स

या फोनसाठी Amazon वर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे असे समजते की या हँडसेटमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर असेल. शिवाय, डिझाइन पुष्टी करते की फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाईल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OxygenOS 16 वर चालतो.

वनप्लस 15 ची फिचर्स

OnePlus 15 मध्ये तिसऱ्या जनरेशनचा 1.5K BOE फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. यात 120W सुपर फ्लॅश चार्ज आणि 50W वायरलेस फ्लॅश चार्जला सपोर्ट असलेली 7,300mAh ची पॉवरफुल बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

OnePlus 15 ची भारतात अपेक्षित किंमत

भारतीय बाजारात या फोनची किंमत 70,000 ते 75,000 रूपये दरम्यान असू शकते, परंतु या अंदाजे किंमती आहेत. कंपनी जेव्हा हा स्मार्ट फोन लाँच करेल तेव्हाच खरी किंमत उघड होईल.